नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतमाला या 784.35 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच-753 एलच्या शाहपूर बायपास ते मुक्ताई नगर या भागाच्या चौपदरीकरणाला हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलखाली मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशमालिकेतून ही माहिती दिली.
? बोरेगांव बुज़ुर्ग से मुक्ताईनगर तक पूरी सड़क चार लेन होने के बाद इंदौर से छत्रपति संभाजी नगर (औरंगाबाद) जाने वाले यातायात को इस मार्ग से डायवर्ट किया जाएगा।#PragatiKaHighway #GatiShakti
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) December 20, 2022
भौगोलिकदृष्ट्या पाहता हा प्रकल्प मार्ग मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे. सध्याचा दुपदरी कॅरेजवे मार्ग हा एनएच-753एलचा एक भाग आहे, तो पहूरजवळील एनएच-753एफच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरला जोडतो. यात महाराष्ट्रातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि खांडवाजवळील एनएच-347बी याचाही समावेश आहे. प्रकल्प मार्गातील दापोरा, इच्छापूर आणि मुक्ताईनगर येथे आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूद केली आहे असे नितीन गडकरी यांनीम्हटले आहे. बोरेगाव बुद्रूक ते मुक्ताई नगर या संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर इंदूरहून छत्रपती संभाजी नगरकडे (औरंगाबाद) जाणारी वाहतूक या मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
? यह परियोजना मार्ग भौगोलिक रूप से मध्य प्रदेश के बुरहानपुर जिले और महाराष्ट्र के जलगाँव में स्थित है। मौजूदा 2-लेन कैरिजवे सड़क NH-753L का एक हिस्सा है, जो पहुर के पास NH-753F के साथ जंक्शन से शुरू होती है,…
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) December 20, 2022
Jalgaon Highway Project Sanction by Minister Gadkari
Madhya Pradesh Maharashtra Aurangabad Indore Link Road Widening