चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय ५० वर्ष) आणि कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय ३७) हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. दोघांनीही एका शेतकऱ्याकडे ७ हजार रुपयंची लाच मागितली. तडजोडी अंती ही रक्कम ५ हजार करण्यात आली आहे. हेच ५ हजार घेताना दोघे सापडले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच, या दोघांची एसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे.
एका शेतकऱ्याची शेतजमीन आहे. वडिलांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये बोरखेडा बु॥ येथील शेतजमीन या शेतकऱ्याच्या नावावर आहे. एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन या शेतकऱ्याला त्याची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करायची आहे जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील. म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये या शेतकऱ्याने तलाठी कार्यालयाला भेट दिली. तलाठी काळे याने सांगितल्याप्रमाणे सदरचे प्रकरण सादर केलेले आहे. सदर शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी काळे यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्याकडून एकुण ७,०००/-रुपये घेतलेले आहे. तरी देखील सदर काम न झाल्यामुळे शेतकऱ्याने तलाठी काळे याची भेट घेतली. यासाठी आणखी ५ हजार रुपये देण्याची मागणी कोतवाल चव्हाणने केली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि तलाठी काळे व कोतवाल चव्हाण हे ५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
सापळा व तपास अधिकारी-*
श्रीमती.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
सापळा पथक-*
PI.श्री.संजोग बच्छाव,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे.
*कारवाई मदत पथक-*
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
मार्गदर्शक-*
1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मोबा.नं. 91 93719 57391
2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3)* मा.श्री.नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Jalgaon Chalisgaon ACB Trap Bribe Corruption