India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एक हजार जैन साध्वी बनणार सदिच्छा दूत; करणार याची जनजागृती

India Darpan by India Darpan
October 12, 2022
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिलांमधील स्तनांचा कर्करोग ही भारतातील सर्वात मोठी गंभीर समस्या मानली जाते. त्यातच अलीकडच्या काळात जैन साध्वी मध्ये स्तनांचे कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आढळून आले, त्यामुळे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सुमारे एक हजार जैन साध्वी सदिच्छा दूत तथा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून कार्य करणार आहेत. या विधायक उपक्रमाबाबत जैन समाजात कौतुक होत आहे. महिलांमधील कॅन्सर विरोधातील लढाईमध्ये जैन समाजाने धर्मगुरु व विविध जैन संघ, अहमदाबाद यांच्या सहकाऱ्याने ही चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशाप्रकारे या विधायक उपक्रमाला सुरुवात होण्याचे कारण म्हणजे अहमदाबाद शहरात सुमारे २०० पेक्षा जास्त साध्वींच्या तपासणी तथा स्क्रीनिंग पैकी चार चाचण्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आढळली आहेत. आपल्या देशात महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी हा आजार होणाऱ्या महिलांची संख्या २.१ मिलियन असून कर्करोगामुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूंचे कारण देखील स्तनांचा कर्करोग हेच आहे. आयुर्मानामध्ये वाढ, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत. या विधायक उपक्रमाची सुरुवात प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. मुकेश बावीशी यांच्या जनजागृतीमुळे झाली आहेत. त्यांनी आजवर १२ जैन साध्वींची ब्रेस्ट सर्जरी केलेली आहे.

डॉ. मुकेश बावीशी यांच्या पत्नी डॉ. विदुला बावीशी यांचीही या उपक्रमात महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे डॉ. बावीशी यांनी १७० जैन संघाची प्रमुख संस्था जैन महासंघाचे प्रमुख प्रवीणभाई शाह यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनी या उपक्रमाला परवानगी दिली. आता आंबावाडी जैन संघ, अहमदाबादपासून स्क्रीनिंगची सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत डॉ. मुकेश बावीशी यांनी सांगितले की, देशात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्यामुळे हे महत्त्वाचे आहे. अविवाहित, निसंतान किंवा बाळांना स्तनपान न करणाऱ्या महिलांना याचा जास्त धोका आहे. त्यासाठी याची वेळोवेळी तपासणी गरजेची आहे. त्यामुळेच हा जनजागृती उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

डॉ. विदुला बावीशी यांनी माहिती दिली की, एकासाध्वीजींचे या आजाराने झुंजत असताना निधन झाले. तेव्हाच आम्ही ठरवले की, एकाही साध्वीजी महाराजांना याचा त्रास होता कामा नये, यासाठी काही तरी केले पाहिजे. जुलै महिन्यात माझ्या पतीच्या सहकाऱ्याने संपूर्ण गुजरातमध्ये जैन साध्वीजी महाराजांसाठी विशेष स्क्रीनिंग मेमोग्राफी टेस्ट सुरू केली. आता रोटरी क्लब ऑफ अहमदाबाद मॅजेस्टी, एवरोन हॉस्पिटल, एआयएमएस हॉस्पिटल व निरामई संस्थानच्या संयुक्त उपक्रम व विविध जैन संघाच्या मदतीने संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जाणार आहे.

श्रीमद् विजय राजयशसूरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, रोगनिदान करणे धर्माविरुद्ध नाही. सामान्यत: जैन साधू महाराज किंवा साध्वीजी कधीही तपासणी करीत नाहीत. त्यांच्या प्रमुख गुरुवर्यांच्या आदेशानंतरच ते तपासणीसाठी तयार होतात. आंबावाडी जैन संघात सुमारे ४० साध्वीजी महाराजांच्या स्क्रीनिंगदरम्यान एक साध्वीजी महाराजांमध्ये या आजाराचे लक्षण आढळले. सर्वसामान्यांपर्यंत या धोकादायक आजाराची माहिती पोहोचावी, या उद्देशाने साध्वीजी महाराजांनी परवानगी घेऊन प्रवचनद्वारे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

विशेष म्हणजे या आजारांमध्ये उपचारांचे चांगले परिणाम मिळावेत आणि रुग्णांना अधिक चांगले जीवन जगता यावे यासाठी आजाराचे स्वरूप लवकरात लवकर निश्चित होणे आवश्यक असते. यासाठी लवकरात लवकर निदान केले जाणे आणि स्क्रीनिंग या दोन स्ट्रॅटेजीज गरजेच्या असतात. लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी कॅन्सरवरील उपचार वेळेवर सुरु करण्यावर आणि प्रभावी निदान सेवांची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते.

डॉ. बावीशी यांनी आणखी सांगितले की, आतापर्यंत २२० साध्वींची अत्याधुनिक थर्मो मेमोग्राफी कॅमेरातून स्क्रीनिंग करण्यात आली. आता महिला रोगतज्ज्ञ डॉक्टर राज्यातील विविध भागांमध्ये सेवा देत आहेत. राज्यात पुढील वर्षीच्या जूनपर्यंत सुमारे २ हजारांपेक्षा जास्त साध्वींची परवानगी घेऊन स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच मात्र ब्रेस्ट कॅन्सरची शंका आली किंवा लक्षणे जाणवू लागली की, लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी आणि योग्य ते उपचार सुरू करावेत. आरोग्य आणि खाण्यापिण्याशी संबधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Jain Sadhvi Awareness Campaign
Breast Cancer


Previous Post

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत मोठा बदल; १ ऑक्टोबरपासून लागू

Next Post

कांदा उत्पादकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; घेतला हा निर्णय

Next Post

कांदा उत्पादकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group