नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलिसांनी चार ठिकाणी छापा टाकत ३० लाख रुपये किमतीचा गुटखा वाहतूक व साठवणूक करतांना पकडला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. ग्रामिण जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांच्या आदेशाने सध्या ग्रामिण भागात अनेक अवैध धंद्याविरोधात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत आहे. या मोहिमेतच ही कारवाई करण्यात आली आहे.