येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तान जवळ बिबट्याचा मानवी वस्तीत सरार्सपणे वावरत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. शहरा जवळ असलेल्या कॉलनी भागात बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली. गेल्या काही दिवसापासून जिल्हयातील अनेक भागात बिबट्याचा वावर हा शहरीभागात दिसून आला आहे. आता येवल्यात बिबट्याचे दर्शन झाले आहे.