बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण; फ्लाइट प्रकल्पाचा शुभारंभ

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 5:53 pm
in संमिश्र वार्ता
0
iti 1

मुंबई –  राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आणि यूएन वुमेन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) मुलींसाठी फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आयटीआयमधील मुलींना कोडींग तसेच इतर सॉफ्ट स्किल्स शिकविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा नुकताच ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, यूएन वुमनच्या वरिष्ठ अधिकारी कांता सिंह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, युएन वुमेनच्या रुतुजा पानगांवकर, श्रीमती सुजान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी फ्लाईट कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे आयटीआयकडे मुलींचा ओढा वाढेल व त्यामाध्यमातून त्यांना कौशल्य विकास तसेच रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींचे प्रवेश, मुलींचा ओढा वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व प्रयत्नांमध्ये महिलांना प्रोत्साहन देणारे तसेच त्यांच्या यशाच्या वाटेतील अडथळ्यांवर मात करण्याइतपत सक्षमीकरण साध्य करणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तसेच वरिष्ठ नेतृत्व पदांवर महिलांचे अधिक चांगले प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणातील महिलांच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर करून महिलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने फ्लाईट कार्यक्रम एक प्रभावी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दादर येथील महिला आयटीआयमधील विद्यार्थिनी आरती चंद्रनारायण म्हणाली की, FLIGHT कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थिनीला रोजगाराची संधी मिळेल. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलींनी पुढे यावे असे आवाहन तिने केले.

फ्लाइट कार्यक्रमामध्ये राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पॉलिटेक्निक आणि महाविद्यालये सहभागी होणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, यूएन वुमेन, त्यांचे समन्वयक व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या इतर संस्था यांचा संयुक्त सहभाग फ्लाइट कार्यक्रमात असणार आहे. स्त्री- पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी, विशेषतः कौशल्यपूर्ण शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या विषयाशी निगडीत क्षेत्रांमध्ये यंत्रणा मजबूत करण्यासाठी कोशल्य विकास विभाग आणि यूएन वुमेन यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्याअंतर्गत फ्लाइट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. फ्लाईट कार्यक्रमाला PROSUS गटाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी PRDAAN आणि B-ABLE हे सहभाग देणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ? राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे

Next Post

इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011