इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयटी सेवा देणाऱ्या विख्यात अॅक्सेंचर कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. कंपनी सुमारे १९ हजार कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवणार आहे. कंपनीने आपला वार्षिक महसूल आणि नफ्याचा अंदाजही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाचे ताजे संकेत म्हणजे बिघडलेल्या जागतिक आर्थिक दृष्टीकोनामुळे कॉर्पोरेट कंपन्यांनी आयटी सेवांवरील खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे.
मंदीमुळे उद्योगांना फटका बसण्याची भीती आणि तंत्रज्ञान बजेट कपातीच्या चिंतेने कंपनीने गुरुवारी आपली वार्षिक महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाज कमी केला. कंपनीच्या ताज्या अंदाजानुसार स्थानिक चलनात ८% ते १०% वार्षिक महसूल वाढीचा अंदाज आहे. कंपनीने यापूर्वी ८% ते ११% पर्यंत महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.
कंपनीने सांगितले आहे की, बिल न भरलेल्या कॉर्पोरेट कर्मचार्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा फटका बसणार आहे. कंपनीतील कपातीचे वृत्त सार्वजनिक झाल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या समभागांनी चार टक्क्यांची उसळी घेतली.
IT Giant Company Accenture Announcement Layoffs