इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी नुकतेच पुन्हा एकदा आजोबा झाले. एका गोड नातीचे ते आजोबा झाले. नुकतेच तिचे बारसे झाले आणि या गोड छकुलीला ‘आदिया’ असे सुंदर नाव देखील मिळाले. बारशाला तिला अनेक गिफ्ट मिळाले. यातील एक भेट चांगलीच चर्चेत आहे. या अनोख्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही भेट साधीसुधी नाही. तर यात आहेत सोन्याच्या १०८ घंटा. या घंटा देव – देवतांच्या शक्तीचे प्रतीक आहेत.
काय आहे अर्थ?
आदियाला एक सुंदर भेट मिळाली आहे. ही भेट केवळ दिसायला सुंदर नाही तर खूप महाग आणि अर्थपूर्ण आहे. या गिफ्टला लाल रंग देऊन त्याला सोन्याच्या घंटा, दिवे आणि झेंडूच्या फुलांनी सजवलं आहे. याच्या वरच्या बाजूला ‘आदिया शक्ति’ असं लिहिण्यात आलं आहे. यात सोन्याच्या लहान १०८ घंटा जोडल्या आहेत.
आदियाला मिळालेल्या या गिफ्टचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या भेटवस्तूला कशा पद्धतीने सजवले आहे, हे व्हिडिओमध्ये दिसते आहे. ही भेट टप्प्याटप्प्यांत उघडली जाते. त्याच्या प्रत्येक चरणात देवी – शक्तीची नावे आणि त्यांचे अर्थ लिहिलेले आहेत. यातील १०८ घंटा या हिंदू वेदांच्या १०८ मंत्रांचे प्रतीक आहेत. या दानातून देवी-देवतांच्या शक्तींचे एकत्र वर्णन करण्यात आले आहे. या भेटवस्तूशी संबंधित हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे गिफ्ट आणि या मागचा अर्थ कळल्यावर नेटकरी अवाक् झाले आहेत.
Isha Ambani Daughter Adiya Expensive Gift Gold