नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे बॉलीवूड विषयी सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः सिने रसिकांना खूपच आकर्षण असते. या क्षेत्रातील मंडळी काय करतात? याची सर्वांनाच उत्सुकता असते. यातील असे अनेक कलाकार आहे की, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला असतोच, परंतु इतकेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालन पोषण करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.
विशेष म्हणजे अनेक स्टार्स यांनी ज्या मुलांना दत्तक घेतले, त्यांना या जगात आपले म्हणवणारे कोणीच नव्हते. ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता सेनपासून ते सनी लिओनीपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी मुलांना दत्तक घेऊन त्यांना चांगले आयुष्य तर दिले आहे तसेच त्यांना त्यांच्या आई-वडिलांचं प्रेमही दिले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुली दत्तक घेऊन एक आदर्श ठेवला आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुष्मिताने सन २०००मध्ये रेनीला दत्तक घेतले. यानंतर २०१० मध्ये तिने एलिशाला दत्तक घेतले. अशा प्रकारे, सुष्मिता दोन मुलींची आई आणि एकल पालक आहे. असे असले तरी ती तिच्या कामासोबतच आई म्हणून जबाबदारीही पार पाडते.
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. कारण रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांच्या नजरा सुष्मिता सेनवर खिळल्या होत्या. दरम्यान, आता सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी एक वेगळी बातमी समोर येत आहे. वास्तविक, सुष्मिता सेन काही वेळापूर्वी तिच्या दोन मुलींसह मीडिया फोटोग्राफर्ससमोर आली होती आणि यावेळी तिच्यासोबत एक लहान मूलही दिसले.
सुष्मिता सेन ४७ वर्षांची झाली आहे. मात्र बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता सुष्मिता काय करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, सुष्मिता सेनने नुकताच एक मुलगा दत्तक घेतला आहे. परंतु सुष्मिता सेनकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधी सुष्मिता सेनने नेरेन आणि अलीशाला दत्तक घेतले आहे.
सुष्मिताने स्वतःच्या वयाच्या २४ व्या वर्षी सेनने रेने हिला दत्तक घेतले होते आणि त्यानंतर तिने दहा वर्षांनी ३४ व्या वर्षी अलीशा हिला दत्तक घेतले होते. सुष्मिता सेनचा लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता तिची मुलगी रेनी, अलिशा आणि एका लहान मुलासोबत दिसत आहे. म्हणजे सुमारे १३ वर्षांनी पुन्हा एकदा सुष्मिता सेन आणखी एका मुलाला दत्तक घेतले आहे, २३ वर्षाच्या काळात ३ दत्तक मुलांची आई बनल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेनचा आनंद पाहायला मिळत आहे. सुष्मिता सेनचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेक जण तिला ‘वंडरफुल वुमन’चा टॅग देत आहेत. त्यातच रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन आजकाल स्वतःकडे खूप लक्ष देत आहे.
https://twitter.com/thesushmitasen/status/1481565997530513410?s=20
सुष्मिता सेन दररोज तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सुष्मिता सेन ज्या पद्धतीने आयुष्यात प्रगती करत आहे, ते पाहून चाहते तिचे कौतुक करताना दिसतात, त्याचबरोबर सुष्मिता सेन अलीकडेच आर्या 2 या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सिरीजमधील सुष्मिताच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. परंतु सगळ्यात विशेष बाब म्हणजे मुलांचे असलेल्या सुष्मिताचे अनेक जण वारंवार कौतुक करीत आहेत.