इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही जर दक्षिण भारतात पर्यटनासाठी जाण्यास इच्छूक असाल आणि तुम्हाला स्वस्तात टूर करायची असेल तर नामी संधी चालून आली आहे. अवघ्या १३ हजार ५०० रुपयात तुम्ही ७ रात्र आणि ८ दिवसांचा टूर करु शकता. इंडियन रेल्वे कॅटरिंग व टूरिझमकडून ‘स्वदेश दर्शन स्पेशल पर्यटन विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे पर्यटकांसाठी स्वस्तात सहलीची आयोजन केले जाते. या विशेष रेल्वे योजनेविषयी जाणून घेऊया..
स्लीपर SL व AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्चासह सहल यांचा समावेश आहे.
स्वदेश दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन.. 8 दिवस 7 राञी
तारीख :- 24/01/2023 ते 30/01/2023
प्रस्थान व उतरण्याचे ठिकाण : कल्याण, पुणे,
1. *बजेट* — *13900/*- प्र. व्यक्ती (नॉन एसी स्लीपर क्लास,नॉन एसी बस व निवास कॉमन हॉल)*
2. *स्टँडर्ड क्लास* — *15300/* – प्र. व्यक्ती (नॉन एसी स्लीपर क्लास,नॉन एसी बस व निवास नॉन एसी रूम)*
या व्यतिरिक्त AC पर्याय सुद्धा उपलब्ध ₹23800
भेटीची ठिकाणे –
* 24-01-2023 कल्याण, पुणे, मार्गे प्रवास सुरुवात
* 26-01-2023 रामेश्वरम येथे आगमनानंतर रामेश्वर मंदिर दर्शन रामेश्वरम येथे रात्री मुक्काम*
* 27-01-2023 *न्याहारीनंतर मदुराईकडे प्रस्थान, मदुराई येथे आगमनानंतर. ( सर्व श्रेणीसाठी ऑटो रिक्षा शेअर करून) मीनाक्षी मंदिराला भेट. व नंतर कन्याकुमारी जाण्यासाठी ट्रेनने प्रयाण*
* 28-01-2023 * *कन्याकुमारी येथे आगमन. कन्याकुमारी मंदिर दर्शन, गांधी मंडपम पाहून स्वतः कन्याकुमारी बीच पाहून रेनिगुंटाला जाण्यासाठी ट्रेनने प्रयाण *
* 29-01-2023 *रेनिगुंटा येथे आगमन. तिरुपती बालाजी मंदिर दर्शन रात्री मुक्काम*
* 30-01-2023 *ब्रेकफास्ट नंतर पद्मावती मंदिर दर्शन करुन संध्याकाळी कल्याण, पुणे मार्गे प्रस्थान*
* 31-01-2023 *टूर समाप्त*
*बोर्डिंग पॉइंट्सः कल्याण, पुणे *
समाविष्ट सेवा व सुविधा –
वरील पॅकेज प्रमाणे रेल्वे प्रवास कन्फर्म रिज़र्वेशन सह , राहण्याची निवास ची व्यवस्था*
*शुद्ध शाकाहारी जेवण दोन वेळा व 1नाश्ता, चहा*
*प्रवास विम्याची व्यवस्था*
*माहितीसाठी टूर एस्कॉर्ट्स*
*सुरक्षा व्यवस्था*
*टीप:-मंदिर दर्शन पास यात समाविष्ट नाही
IRCTC South Darshan Special Train Package
Tourism