India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर; बघा, विजेत्यांची संपूर्ण यादी

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा – सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे.

३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक, शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ (नाशिक) या मंडळाला द्वितीय पारितोषिक, तर श्री आवडता गणेश मंडळ (नांदेड) या मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम चित्रपट अभ्यासक संतोष पाठारे आणि कलावंत विकी शिंदे यांनी पाहिले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिली. तसेच, घरगुती गणेशोत्सव सजावट आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही स्पर्धांना मिळून एकूण वीस उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

१. घरगुती गणेशोत्सव सजावट गट:
१. प्रिती पवार (नाशिक), २. प्राची पाटील (कोल्हापूर), ३. अदिरा इंगळे (पुणे), ४. नितीन पाटील (नाशिक), ५. ललिता कोठावदे (नाशिक), ६. स्वप्निल मुळे (पुणे),७. पराग अत्तरदे (जळगाव), ८. रमेश सूर्यवंशी (लातूर), ९. सुनिल करंबेळे (रत्नागिरी) आणि १०. स्नेहल खराळकर (पुणे).

घरगुती गणेशोत्सव सजावट गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गट :
१. प. पू गगनगिरी महाविद्यालय सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ (अहमदनगर), २. हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल मंडळ (कोल्हापूर) ३. राजे शिवाजी विद्यालय गणेश मंडळ (नंदुरबार), ४. गणराज तरुण मंडळ (अहमदनगर) ५. विजय बाल उत्सव गणेश मंडळ (नागपूर), ६. श्री अष्टविनायक मित्र मंडळ (पुणे), ७. भारत क्रिडा मंडळ (नागपूर), ८. शंकरपुरा पेठ सांस्कृतिक विकास मंडळ (पुणे) ९. सुवर्णयुग तरुण मंडळ (अहमदनगर) आणि १०. श्री.कृष्ण गणेश मित्र मंडळ (अहमदनगर)
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

Ganesh Festival Decoration Election Competition Result


Previous Post

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी MTDCच्या या आहेत खास ऑफर्स

Next Post

IRCTCची जबरदस्त योजना… अवघ्या १३ हजारात करा दक्षिण भारत दर्शन… ७ रात्र आणि ७ दिवस… जाणून घ्या याविषयी सविस्तर

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

IRCTCची जबरदस्त योजना... अवघ्या १३ हजारात करा दक्षिण भारत दर्शन... ७ रात्र आणि ७ दिवस... जाणून घ्या याविषयी सविस्तर

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group