मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. परंतु आता महाराष्ट्रात देखील असे प्रकार घडत असल्याने खळबळ उडाली आहे. खंडणी उकळल्याप्रकरणी फरार आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्याच्या विरुद्ध लूक आऊट नोटिस जारी करण्यात आली आहे.
राज्यातील सीबीसीआयडी गुन्हे शाखेच्या पथकाने बस्ती येथील व्यावसायिक कर कार्यालयात तैनात सहायक विक्रीकर आयुक्त आशुतोष कुमार मिश्रा याला गेल्याच महिन्यात अटक केली आहे. मुंबईतील अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी फरार आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी याचे संबंधित सहाय्यक आयुक्त आशुतोष कुमार मिश्रा नाव पुढे आले होते. वाणिज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त आशुतोष कुमार मिश्रा हे निलंबित आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी याचे नातेवाईक आहेत. तर त्रिपाठी हा मुंबईच्या अंगडिया (कुरिअर) असोसिएशनमधून वसुली प्रकरणात फरार आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आशुतोषला त्याच्या कार्यालयातून अटक केली. ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला नेण्यात आले
मुंबईतील पथकाने प्रथम एसपी आशिष श्रीवास्तव यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर सीओ (सिटी ) आलोक प्रसाद आणि पोलिसांसह व्यावसायिक कर कार्यालयात पोहोचले. मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती येथील विभागीय अधिकाऱ्यांना देताना वाणिज्य कर अधिकारी आशुतोषकुमार मिश्रा यांच्या अटकेची कारवाई पूर्ण झाली. पथकाने त्यांना पकडून प्रथम पोलीस ठाण्यात नेले. येथील बंद खोलीत बराच वेळ चौकशी केल्यानंतर सीजेएमने कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज दिला.
मुंबईतील आंबेडकर नगरात राहणारे आशुतोष मिश्रा हे सध्या व्यावसायिक कर कार्यालय बस्तीमध्ये फिरत्या पथकाचे प्रभारी आहेत. सुमारे चार वर्षांपासून सेटलमेंट प्रकरणामध्ये अडकले आहे. ते निलंबित आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचे मेहुणे आहेत. खात्यातून झालेल्या गैरव्यवहाराच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.
आयपीएस सौरभ कुमार त्रिपाठी हा मुंबईत झोन-2 म्हणून तैनात होता. त्याच्यावर अंगडिया व्यापारी असोसिएशनकडून दरमहा 10 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 19 फेब्रुवारी पासून तो फरार आहे. दि. 22 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने त्याला निलंबित केले आहे.