मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना आज मोठे गिफ्ट दिले आहे. देवेन भारती हे आता मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त असतील. गृह विभागाने आजच हे आदेश काढले आहेत. राज्य सरकारने प्रथमच मुंबई विशेष पोलीस आयुक्त अशा प्रकारच्या पदाची निर्मिती केली आहे. आणि या पदावर भारती हे आरुढ होणार आहेत.
भारती हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईत जॉइंट कमिश्नर (कायदा व सुव्यवस्था), जॉइंट कमिश्नर (आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू), अतिरिक्त पोलिस आयुक्त (क्राइम ब्रँच) या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शिवाय त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्वही केले आहे. महाविकास आघाडी सरकारने देवेन भारती यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी दिली होती. गेल्या १३ डिसेंबर रोजी भारती यांच्या जागी सह आयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून भारती हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. आता नव्या वर्षात त्यांना विशेष पोलिस आयुक्त ही जबाबदारी देण्यात आली आहे.
https://twitter.com/dhavalkulkarni/status/1610608930761347079?s=20&t=G2Rp92khSxAUGWVwFIsWgg
IPS Officer Deven Bharti New Appointment Home Ministry