India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना फडणवीसांचे मोठे गिफ्ट; या पदाची दिली जबाबदारी

India Darpan by India Darpan
January 4, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना आज मोठे गिफ्ट दिले आहे. देवेन भारती हे आता मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त असतील. गृह विभागाने आजच हे आदेश काढले आहेत. राज्य सरकारने प्रथमच मुंबई विशेष पोलीस आयुक्त अशा प्रकारच्या पदाची निर्मिती केली आहे. आणि या पदावर भारती हे आरुढ होणार आहेत.

भारती हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईत जॉइंट कमिश्नर (कायदा व सुव्यवस्था), जॉइंट कमिश्नर (आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू), अतिरिक्त पोलिस आयुक्त (क्राइम ब्रँच) या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शिवाय त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्वही केले आहे. महाविकास आघाडी सरकारने देवेन भारती यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी दिली होती. गेल्या १३ डिसेंबर रोजी भारती यांच्या जागी सह आयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून भारती हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. आता नव्या वर्षात त्यांना विशेष पोलिस आयुक्त ही जबाबदारी देण्यात आली आहे.

In a disruption of the established heirarchy in the #Mumbai police, senior IPS officer Deven Bharti appointed as 'Special' Commissioner of police. This is a newly-created post#Maharashtra #MumbaiPolice pic.twitter.com/QI1FzS5KpR

— Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 (@dhavalkulkarni) January 4, 2023

IPS Officer Deven Bharti New Appointment Home Ministry


Previous Post

संभाजी महाराजांविषयीच्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का? अजित पवार म्हणाले….

Next Post

ईडीचा मोठा दणका! माजी मंत्री अनिल परब यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त; ठाकरे गटाला धक्का

Next Post

ईडीचा मोठा दणका! माजी मंत्री अनिल परब यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त; ठाकरे गटाला धक्का

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group