मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमधील सातवे आणि सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. त्याने अशा लोकांवर निशाणा साधला आहे जे कोहलीची टी-२० कारकीर्द संपल्याचे अनेक दिवसांपासून वक्तव्य करत आहेत.
भारताचा दिग्गज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने म्हटले आहे की, तो खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. कोहलीचा स्ट्राइक-रेट आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीविरुद्धची फलंदाजी यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, परंतु आता त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध शतके ठोकून टीकाकारांना उत्तर दिले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
लीग फेरीच्या शेवटच्या सामन्यानंतर एका मुलाखतीत कोहली म्हणाला, “मला खूप बरे वाटले. बर्याच लोकांना वाटते की माझी टी20 क्रिकेटमधील कामगिरी घसरत आहे, पण मला असे अजिबात वाटत नाही. मला वाटते की मी माझे सर्वोत्तम टी20 क्रिकेट खेळू शकेन. आणि सध्या खेळत आहे.” आरसीबीच्या गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १०१ धावा करून संघाला २० षटकांत १९७ धावांपर्यंत मजल मारली.
कोहली म्हणाला, “मी फक्त माझा आनंद घेत आहे. अशा प्रकारे मी टी-20 क्रिकेट खेळतो. मला अजून खुप खेळायचे आहे. खूप चौकार मारायचे आहेत आणि जर परिस्थितीने मला शेवटी मोठे शॉट्स मारण्याची परवानगी दिली तर खुप काही करण्याचा माझा प्रयत्न आहे.” कोहली टी-20 करिअरमध्ये १२ हजार धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आयपीएल, आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या टी20 सह, कोहलीने ३७४ टी20 सामन्यांमध्ये ४१.४० च्या सरासरीने आणि १३३.३५ च्या स्ट्राइक रेटने ११९६५ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतके आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे.
https://twitter.com/IPL/status/1660325339665670146?s=20
कोहली म्हणाला, “तुम्हाला परिस्थिती समजून घ्यावी लागेल आणि जेव्हा परिस्थितीची मागणी असेल, तेव्हा तुम्हाला तेथे तुमचा खेळ वाढवावा लागेल आणि जोखीम घ्यावी लागेल. मी सध्या माझ्या खेळाचा आनंद घेत आहे आणि मी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे. मी चांगली कामगिरी करत आहे आणि चांगले वाटत आहे. .” माझं लक्ष पावसावर लागत नव्हतं. मी फक्त संघासाठी काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करत होतो.”
या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या मोसमात १४ सामन्यात ५३.२५ च्या सरासरीने आणि १३९.८२ च्या स्ट्राईक रेटने ६३९ धावा केल्या. यामध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ५६.१५ च्या सरासरीने आणि १५३.६८ च्या स्ट्राईक रेटने ७३० धावा केल्या. त्याच वेळी, गुजरातचा शुभमन गिल १४ सामन्यांमध्ये ५६.६७ च्या सरासरीने आणि १५२.४६ च्या स्ट्राइक रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. डुप्लेसिस आणि कोहली आता लीगमधून बाहेर पडल्यामुळे शुभमनला ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे.
https://twitter.com/IPL/status/1660326801833603073?s=20
IPL RCB Virat Kohli After Centaury