मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमध्ये लिलावादरम्यान कोटींच्या भावात खेळाडूंना खरेदी केले जाते. पण खेळाडूंच्या खात्यात प्रत्यक्ष तेवढी रक्कम जमा होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आयपीएलमध्ये खेळाडूंची पगाराच्या बाबतीत फसवणूक होत असल्याची तक्रार खेळाडूंच्या जागतिक संघटनेने केली आहे.
खेळाडूंच्या जागतिक संघटनेने आयपीएल आणि प्रिमीयर लिग मध्ये खेळणाऱ्या स्टार खेळाडूंचा पगार वाढविण्याची मागणी केली आहे. स्टार खेळाडूंसोबत १६ ते १७ कोटी रुपयांचा करार केला जातो. पण प्रत्यक्ष खेळाडूंच्या पगारावर एक अंश रक्कमच खर्च होते. आयपीएलच्या एकूण महसुलातील केवळ १७ टक्के रक्कम ही खेळाडूंच्या पगारावर खर्च होते तर प्रिमीयर लिगमध्ये ७१ टक्के रक्कम खेळाडूंच्या पगारावर खर्च होते. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणारा पगार एनएफएल आणि प्रिमीयर लिगमध्ये खेळाडूंना मिळणारा पगाराच्या तुलनेत खूपच कमी आहे. खेळाडूंना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आयपीएलमधील १० फ्रेंचायजींना बीसीसीआयकडून ४९० कोटी रुपये देण्यात येतात. यात एकूण कमाईतील ५० टक्के रक्कम बीसीसीआय ठेवते. तर तिकीट विक्री, प्रायोजकत्व आणि मर्चंडाईज विक्रीतून फ्रेंचायजीला ५० टक्के कमावता येतात. सरासरी ५०० कोटी रुपयांची कमाई फ्रेंचायजी करतात. पण त्यातील ९५ कोटी रुपये खेळाडूंच्या पगारासाठी ठेवले जातात. बेन स्टोक, विराट कोहली, रविंद्र जडेजा आदी खेळाडूंची कमाई १५ कोटींहून अधिक आहे. त्यातही सर्वांचे पगार इंडेक्स लिंक्ड आहेत. म्हणजे सामना गमावला की प्रत्येक खेळाडूच्या फीमधून २० टक्के रक्कम कापली जाते.
क्रिकेटपटूंचे भारतीय संघटन नाही
भारतात क्रिकेटपटूंचे संघटन नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये जास्त वाटा उचलण्यासाठी खेळाडूंच्या बाजुने लढविण्यासाठी भारतात कुणीच नाही. अश्यात खेळाडूंच्या जागतिक संघटनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. या संघटनेत इंग्लंड, अॉस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.
IPL Player Crore Contract Deals Payment Money