नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांनी पराभव करुन थेट प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. चेन्नईने १४ साखळी सामन्यांमध्ये आठ विजय आणि एक अनिर्णित सामन्यासह १७ गुण मिळवले आहेत. त्याचवेळी दिल्लीचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला. चेन्नईने ७७ धावांनी हा सामना जिंकला.
चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने तीन विकेट गमावत २२३ धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने ८७ आणि ऋतुराज गायकवाडने ७९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला. चेन्नईकडून दीपक चहरने तीन बळी घेतले.
मथिशा पाथिराना आणि महेश तिक्ष्णाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्णधार वॉर्नरने ८६ धावा केल्या. या विजयासह चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईचे लीग टप्प्यात १७ गुण झाले आहेत. आता हा संघ दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफमधील पुढील सामना खेळेल. आता चेन्नईचे खेळाडू लखनौचा शेवटचा सामना हरावा अशी प्रार्थना करतील. या स्थितीत चेन्नई दुसऱ्या स्थानावर राहून पहिला क्वालिफायर खेळणार असून या संघाला अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतील.
https://twitter.com/IPL/status/1659918207086641152?s=20
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन गडी गमावून २२३ धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ७९ आणि डेव्हन कॉनवेने ८७ धावा केल्या. अखेरीस शिवम दुबे २२ आणि रवींद्र जडेजाने २० धावांची जलद खेळी खेळली. दिल्लीकडून खलील अहमद, एनरिच नोर्टजे आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दिल्ली संघाला २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण झाले.
https://twitter.com/IPL/status/1659918464272961537?s=20
IPL Chennai Play Off Entry Defeat Delhi