मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओल्डीज टीम अशी हेटाळणी वाट्याला आलेले महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स हा संघ यंदा आयपीएलमध्ये धुमाकुळ घालतोय. एकीकडे धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उत आलेला असताना दुसरीकडे चेन्नईच्या संघाने प्लेऑफमध्ये दमदार खेळ दाखविला आहे. मुख्य म्हणजे यातून पुन्हा एकदा धोनीच सर्वांवर भारी असल्याचे सिद्ध झाले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. चेन्नईने शनिवारी आयपीएलच्या गटसाखळीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध खेळला. तेव्हा त्याच्यासोबत ९-२-११ चा योगायोग साथ देत होता. कर्णधार धोनीच ७-७चं भाग्य ऐनवेळी असे काही चमकले की, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ थेट प्लेऑफमध्ये जाऊन पोहोचला. लखनौ सुपरजायंट्सच्या संघानेही अंतिम ४ संघात स्थान मिळवलं आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बेरीज वजाबाकीची चुरस आहे.
नऊ वेळा अंतिम फेरी
आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी मुंबई इंडियन्सने जिंकल्या आहेत मात्र सर्वाधिकवेळा फायनलमध्ये खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्सच्या नावावार आहे. २००८ पासून २०२२ पर्यंतच्या १५ हंगामापैकी १३ हंगामात चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यापैकी ९ वेळा चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. २०२६ आणि १७ मध्ये बंदीमुळे ते आयपीएल खेळले नव्हते.
चेन्नई ट्रॉफीच्या जवळ
प्लेऑफचा विचार केल्यास गेल्या १५ वर्षात चेन्नईचा संघ एकूण ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हा आयपीएलमध्ये एक विक्रम आहे. यावेळी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाल २ गुणांची गरज होती. २ वेळा फायनल खेळल्याचा आत्मविश्वास आणि ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचल्याचा अनुभव यादरम्यान, चेन्नईला दिल्लीविरुद्धच्या सामन्यातून २ गुणांची गरज होती. ९-२-११ च्या या योगायोगाने चेन्नईचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
Location: Delhi ?
Emotion: MS Dhoni ?
Special Saturday Moments ?
This is heartwarming! ☺️#TATAIPL | #DCvCSK | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/s217v3HZ4k
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023
IPL Chennai MS Dhoni Playoff Luck Coincidence