दुबई – चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा गोलंदाज दीपक चहरने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात एक गोड बातमी दिली. दीपकने त्याच्या गर्लफ्रेंडला भर सामन्यात म्हणजेच स्टेडिअममध्येच प्रपोज केले. सर्व प्रेक्षकांनी हा नजारा पाहिला. तसेच, या गोड घटनेचा व्हिडिओही सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. अतिशय फिल्मी स्टाईलने केलेले हे प्रपोज सर्वांच्याच लक्षात राहणारे आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज आहे. हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. जया ही बिग बॉस फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. तर, दीपक हा बॉलिवूड अभिनेत्री मालती चाहरचा भाऊ आहे. बघा हा गोड व्हिडिओ
https://twitter.com/IPL/status/1446115045117595648?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1446115045117595648%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fcricket%2Fcricket-news%2Fcsk-vs-pbks-chennai-pacer-deepak-chahar-proposes-his-girlfriend-after-end-of-match