इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय नागरिकांचे क्रिकेटविषयक प्रेम जगजाहीर आहे, त्यातच कसोटी सामना असो की, ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा इतकेच नव्हे तर वर्ल्डकप असो की आयपीएल या सगळ्याच क्रिकेट सामन्यात विषयी रसिक प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यातच आता यंदाचा आयपीएल हंगाम लवकरच सुरू होणार असून यासाठी विविध संघांचे खेळाडूंची बोली लागणार आहे. त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी मेगा लिलावाच्या रणनीतीसह सर्व 10 संघ तयार आहेत. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला हे जाणून घ्यायचे असते की त्यांचा आवडता खेळाडू किंवा आवडता संघ त्यांच्यासोबत अन्य कोणता खेळाडू आहे. ही प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. यादीत समाविष्ट 590 खेळाडूंचे भवितव्य पूर्णपणे बंद झाले आहे. यात अनेक देशातील खेळाडू असून त्यांच्यावर दि.12 आणि 13 फेब्रुवारीला बोली लागणार आहे. IPL 2022 चा लिलाव बंगळूरुच्या हॉटेलमध्ये होणार असून बोली प्रक्रियेची अधिकृत वेळ अद्याप काही जणांना माहित झालेली नाही. परंतु बीसीसीआयने त्याची वेळ सकाळी 11 वाजता निश्चित केली आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या नवीन हंगामात एकूण 10 संघ प्रवेश करतील आणि फ्रँचायझी त्यांच्यानुसार खेळाडूंवर बोली लावतील. या दरम्यान, डझनभर खेळाडूंचे चांगले नशीब उघडणार आहे, तर अनेक खेळाडू देखील स्विकारले जाणार नाहीत, कारण काही वेळा कोणताही संघ त्यांच्यावर बोली लावत नाही.
आता आपण IPL 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे, वास्तविक, स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. या परिस्थितीत प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरच IPL लिलावाचे लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर IPL 2022 लिलाव थेट पाहू शकता. लिलाव जरी इंग्रजी भाषेत असेल, तरीही स्टार स्पोर्ट्सवर हिंदी आणि इतर भाषांमध्ये लाइव्ह कव्हरेज पाहायला मिळेल, कारण वेगवेगळ्या चॅनेलवर बसलेले तज्ज्ञ त्याच भाषेत माहिती देतील. याशिवाय, तुम्हाला Disney प्लस Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.