इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएल २०२५ ट्रॉफीचा अंतिम सामना आज ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स रंगणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणार आहे. पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान पाऊस होण्याची ६२ टक्के शक्यता आहे. पावसामुळे खेळ वाया गेल्यास अंतिम सामन्यासाठी १ राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना ४ जून रोजी होईल. यावेळी पाऊस आला तर गुणतालिकेतील अव्वल असणा-या संघाला विजयी घोषित केले जाईल. त्यामुळे पंजाब किंग्सला ही ट्रॅाफी मिळेल.
आयपीएलमध्ये पंजाबची अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी तर आरसीबची चौथी वेळ आहे. पण, या दोन्ही संघांना अंतिम फेरीत विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांची १८ वर्षांपासून आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची प्रतिक्षा कायम आहे. ज्या स्टेडियमवर हे सामने होणार आहे. त्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतील ४३ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी २१ वेळा टॉस जिंकून बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर टॉस जिंकून फिल्डिंग करणारी टीम २२ वेळा यशस्वी झाली आहे.
अहमदाबादमध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने गुजरात विरुद्ध याच १८ व्या मोसमात ५ विकेट्स गमावून २४३ धावा केल्या. तर निच्चांकी धावसंख्येचा विक्रम गुजरात टायटन्सच्या नावावर आहे. गुजरातने दिल्ली विरुद्ध ८९ रन्स केल्यात. या मैदानात सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याच्या नावावर आहे. गिलने २०२३ साली मुंबई इंडियन्स विरुद्ध १२९ रन्स केल्या आहेत.