मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात चहलने ही कामगिरी केली. त्याने कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला बाद करून ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने 183 विकेट्स घेतल्या.
ब्राव्होबद्दल बोलायचे झाले तर त्याने 161 सामन्यात 183 विकेट घेतल्या. त्याला मागे टाकण्यासाठी चहलने 18 सामने कमी खेळले. त्याने 143 व्या सामन्यात ही कामगिरी केली. चहल राजस्थानपूर्वी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्यही आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त ड्वेन ब्राव्हो मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला.
ICYMI!
That landmark moment when @yuzi_chahal became the leading IPL wicket-taker of all-time.#TATAIPL pic.twitter.com/IhkMNdB6ud
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
खेळाडू… सामने… विकेट
युझवेंद्र चहल …143… 187
ड्वेन ब्राव्हो …161… 183
पियुष चावला… 176… 174
अमित मिश्रा …160 …172
रविचंद्रन अश्विन… १९६… १७१
चहलने केला कहर
कोलकाताविरुद्ध चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 25 धावा देऊन चार विकेट घेतल्या. चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. चहलने आयपीएलमध्ये 143 सामन्यात 187 विकेट घेतल्या आहेत.
That feeling of becoming the leading wicket-taker in IPL.
Hear from the man of the moment, @yuzi_chahal. #TATAIPL | #KKRvRR pic.twitter.com/gRfJ05MCYk
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
IPL 2023 Yajuvendra Chahal World Record