इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारांमध्ये नेहमीच चढ उतार होत असते. त्यामुळे काही शेअरचे भाव प्रचंड वाढतात. तर काहींचे कोसळतात, परंतु काही कंपन्या अशा आहेत की, त्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना बहुतांश वेळा फायदा करून देतात, याचा फायदा एका वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना झाला आहे. बुलेट निर्माता आयशर मोटर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीने खूप मजबूत परतावा दिला आहे. आयशर मोटर्सच्या शेअर्सनी गेल्या 20 वर्षांत 80 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कंपनीच्या समभागांनी गेल्या 10 वर्षांत 1,500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आयशर मोटर्सच्या स्टॉकमध्ये 10 हजार रुपये ठेवणारे गुंतवणूकदारही लाखो रुपयांचे मालक झाले आहेत.
आयशर मोटर्सचे शेअर्स 25 जानेवारी 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 3.17 रुपयांच्या पातळीवर होते. 28 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 2609 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी 82,300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने 25 जानेवारी 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आजपर्यंत हे पैसे 82.31 लाख रुपये झाले असते.
जर एखाद्या व्यक्तीने 25 जानेवारी 2002 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि स्टॉकमधून पैसे काढले नसतील, तर सध्या ही रक्कम 8.2 कोटी रुपये झाली असती. म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारी व्यक्ती 20 लाखांमध्ये 8 कोटी रुपयांहून अधिकची मालक असेल. आयशर मोटर्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,018.80 रुपये आहे. त्याच वेळी, स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 2,303.75 रूपये आहे. आयशर मोटर्सचे मार्केट कॅप 71,300 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.