इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
जगभरातील क्रिकेट शौकिनांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्याकडे लागले आहे. आशिया चषक स्पर्धेत हा सामन्यात वारंवार पाऊसाचा व्यत्यय येत आहे. पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना थांबला. त्यानंतर राखीव असलेल्या दुस-या दिवशी हा सामना सुरु झाला. पण, त्यातही पावसाने मध्येच बॅालिंग केली. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला होता. पण, आज जिथे सामना थांबला तेथूनच आज पुन्हा सुरु झाला. रविवारी पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन बाद १४७ धावा केल्या. आज टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर पाकिस्तानने ११ षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ४४ धावा केल्या. आजचा सामना रात्री ९.२० वाजता पुन्हा सुरु झाला.
सोमवारी भारताने सामन्याची सुरुवात केल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतके झळकावली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली १२२ तर केएल राहुल १११ धावांवर नाबाद होते. पाकिस्तानची गोलंदाजी भारताच्या फलंदाजापुढे फिकी पडली. विराट कोहलीने १७ हजार धावाही या सामन्यात पूर्ण केल्या.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हे सामने हंबनटोटा किंवा दांबुला येथे हलवले जातील, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पावसाचा व्यत्यय येत असतांना हे सामने होत आहे.
The match was stopped due to rain, the crowd cheered