इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
जगभरातील क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. आशिया चषक स्पर्धेत हा सामन्यात वारंवार पाऊसाचा व्यत्यय येत असतांना हा सामना अखेर पूर्ण झाला. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त १२८ धावातच गारद झाला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादव याने फखर जमान, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ यांना बाद केले. तर इमाम उल हक याला बुमराहने बाद केले. हार्दिक पांड्याने बाबर आझमला तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूर याने मोहम्मद रिझवानचा अडथळा दूर केला. हॅरिस रौफ आणि नसीम शाह दुखापतग्रस्त असल्यामुळे फलंदाजीला आले नाहीत. पाकिस्तान संघाने ३२ षटकात ८ बाद १२८ धावा केल्या.
पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना थांबला होता. रविवारी पावसामुळे थांबलेला सामना आज पुन्हा सुरु झाला. रविवारी पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन बाद १४७ धावा केल्या. आज टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर पाकिस्तानने १२८ धावा केल्या.
पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली
सोमवारी भारताने सामन्याची सुरुवात केल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतके झळकावली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली १२२ तर केएल राहुल १११ धावांवर नाबाद होते. पाकिस्तानची गोलंदाजी भारताच्या फलंदाजापुढे फिकी पडली. विराट कोहलीने १७ हजार धावाही या सामन्यात पूर्ण केल्या.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हे सामने हंबनटोटा किंवा दांबुला येथे हलवले जातील, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पावसाचा व्यत्यय येत असतांना हे सामने येथेच झाले. त्यात भारताने आज पाकिस्तानचा पराभवा केला.
India’s resounding victory over Pakistan… Kuldeep dismissed five batsmen