मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईने पोळलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक दणका मिळाला आहे. कारण, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिवनावश्यक व्सतूंच्या किंमती मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत सर्वसामान्यांचे उत्पन्न तेवढेच आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा कठीण परीक्षेचा असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
इंधनासह विविध वस्तूंच्या किंमतींमुळे देशात महागाई वाढत आहे. भाजीपाला, खाद्यतेल यापासून दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यात आता घरगुती गॅस सिलेंडरने दणका दिला आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल ५- रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. हे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना आता थेट ९९९ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्यात सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सिलेंडरचे दर ९४९ रुपये ५० पैसे एवढे होते. आता पुन्हा ५० रुपये वाढ झाली आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1522802686391123969?s=20&t=DmNmoFUDSiUUoJvZHw_HDw
दरम्यान, व्यावसायिक सिलेंडरही महागले आहे. गेल्या १ मे रोजीच त्याच्या दरात वाढ झाली आहे. १ मे रोजी १०२ रुपये ५० पैसे एवढी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता व्यावसायिक सिलेंडरचे दर थेट २ हजार ३५५ रुपये ५० पैसे एवढे झाले आहेत.
https://twitter.com/AamAadmiParty/status/1522803082807373825?s=20&t=DmNmoFUDSiUUoJvZHw_HDw