इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात शुक्रवारची रात्र आणि शनिवारची पहाट दुःखद बातमी घेऊन आली आहे. नागपूर-उमरेड रस्त्यावर रात्री तवेरा आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जण ठार झाले. तर मथुरा येथील एक्स्प्रेस वेवर शनिवारी पहाटे एक कार अज्ञात वाहनाला धडकून झालेल्या अपघातात सात जण ठार झाले आहेत. हे सातही जण एकाच कुटुंबातील आहेत.
उमरेडरोड हादरला
नागपूर-उमरेड रोडवर शुक्रवारी रात्री दहा वाजता भरधाव तवेरा ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातातून एक चिमुकली बचावली असून, तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उमरेडवरून नागपूरला येणारी तवेरा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. ही घटना उमरगाव फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शी हादरून गेले होते. या अपघातात सात जण ठार झाले असून एक बालिका आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.
यमुना एक्स्प्रेस वेवर अपघात
मथुराच्या नौहझील पोलिस ठाणे क्षेत्रातील यमुना एक्स्प्रेस वे वर शनिवारी पहाटे पाच वाजता आग्र्याहून नोएडाकडे जाणारी वॅगेनार कार एका अज्ञात वाहनाला धडकली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांमधील सर्व जण एकाच कुटुंबातील असून, ते एक लग्नसमारंभ आटोपून परतत होते.
उत्तर प्रदेश के मथुरा में हुई सड़क दुर्घटना हृदयविदारक है। इस हादसे में जिन्होंने अपने प्रियजनों को खो दिया है, उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2022