शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महागाईचा आणखी एक जबर दणका! गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा भडकल्या

मे 19, 2022 | 10:16 am
in मुख्य बातमी
0
gas cylendra

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढत्या उष्णतेसह महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या देशातील एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरसह व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १९ मे रोजी वाढल्या आहेत. या महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. ७ मे रोजी सिलिंडर ५० रुपयांनी महागले होते. आज पुन्हा एकदा किमती वाढल्याने महागाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे.

पेट्रोल-डिझेलसह खाद्यपदार्थाच्या किमती महाग झाल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात आता पुन्हा एकदा सिलिंडर महागल्यामुळे सामान्य माणसांनी जगावे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या ७ मे रोजी घरगुती एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाले होते. त्यामुळे देशातील बहुतांश भागात एका गॅस सिलिंडरची किंमत १००० रुपयांच्यावर पोहोचली. परंतु दिल्लीत किंमत कमी होती.

आज घरगुती सिलिंडरची किंमत ३ रुपये ५० पैशांनी वाढल्यामुळे हे अंतरही मिटले आहे. आता संपूर्ण देशात एका घरगुती सिलिंडरची किंमत १००० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात दिल्लीतील घरगुती सिलिंडर ८०९ रुपयांवरून १००३ रुपयांवर पोहोचले आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये १४.२ किलो वजनाचे घरगुती सिलिंडर १००३ रुपये, कोलकाता येथे १०२९ रुपये, चेन्नईमध्ये १०१८.५ रुपयांना मिळणार आहे.

सात मे रोजी एलपीजीच्या दरात बदल झाल्यामुळे घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाले होते. तर १९ किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलिंडर १० रुपयांनी स्वस्त झाले होते. आता व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या असून, एक सिलिंडर ८ रुपयांनी महागले आहे. आता दिल्लीमध्ये १९ किलो वजनाचे सिलिंडर २३५४ रुपये, कोलकातामध्ये २४५४ रुपये, मुंबईमध्ये २३०६ रुपये आणि चेन्नईमध्ये २५०७ रुपयांत मिळणार आहे.

एक मे रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी वाढली होती. मार्चमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २०१२ रुपये होती.१ एप्रिल रोजी ते वाढून २२५३ रुपये आणि १ मे रोजी २३५५ रुपयांवर पोहोचले होते. गेल्या वर्षभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ७५० रुपयांची वाढ झाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात लाचखोरीला ऊत; दिवसभरात ३ वेगवेगळ्या सापळ्यांमध्ये ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

राज कुंद्रा आणखी गोत्यात; आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
raj kundra

राज कुंद्रा आणखी गोत्यात; आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011