India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अवघ्या २५ हजार रुपयात उपलब्ध होणार; हा लॅपटॉप इन्फिनिक्सचा ‘इनबुक एक्स१ निओ’ लॉन्च

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम ब्रॅण्डने विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षित व अनुकूल लॅपटॉप इनबुक एक्स१ निओ २४,९९० रूपये या आकर्षक दरामध्ये लॉन्च केला आहे. नवीन इनबुक एक्स१ निओ विभागातील वजनाने हलका आणि सर्वात शक्तिशाली लॅपटॉप म्‍हणून लक्षवेधक प्रभाव निर्माण करण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामधून अधिकतम लाभाची खात्री मिळते. हा लॅपटॉप शक्तिशाली अनुभवासह अमर्यादित मल्टीमीडिया लर्निंगसाठी जलद चार्जिंग सपोर्ट देतो. फक्त १.२४ किग्रॅ वजनासह १४.८ मिमी जाडी असलेल्या या लॅपटॉमध्ये इंटेल सेलेरॉन क्वॉड कोअर एन५१०० प्रोसेसरची शक्ती आहे आणि हा ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्टमध्ये येतो. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर उपलब्ध असून सिटी, आरबीएल, कोटक व अॅक्सिस बँक या बँकांकडून बँक ऑफर्स देखील आहेत.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कपूर म्हणाले, “आजच्या हायब्रिड अध्ययन वातावरणामध्ये पीसींची वाढती लक्षणीय भूमिका पाहता आम्ही नवीन इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओ लॉन्च करत आहोत, जो डिजिटल विद्यार्थ्यांना दैनंदिन टास्क्ससाठी आवश्यक असलेली कार्यक्षमता देण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे. इनबुक एक्स१ निओ मध्ये शक्तिशाली कार्यक्षमतेसाठी इंटेल सेलेरॉन प्रोसेसरची शक्ती आहे आणि हा कॉस्मिक ब्ल्यू व स्टारफॉल ग्रे या दोन आकर्षक रंगांमधील लक्षवेधक अॅल्युमिनिअम अलॉई आधारित मेटल बॉडीसह येतो.”

जलद कार्यक्षमता आणि व्यापक स्टोरेज:
टॉप-स्पीड कार्यक्षमता देण्यासाठी इंटेल सेलेरॉन प्रोसेसर विद्यार्थ्यांना सहयोग, निर्मिती, अध्ययन करण्यामध्ये, तसेच गेम्स खेळण्यामध्ये मदत करण्यासाठी इनबुक एक्स१ निओला अभूतपूर्व शक्ती देतो. या लॅपटॉपमध्ये जवळपास ८ जीबी रॅम आणि जवळपास २५६ जीबी एम.२ एनव्हीएमई पीसीआयई ३.०एसएसडीची व्यापक स्टोरेज क्षमता आहे, ज्यामधून सामान्यत: हेवी लॅपटॉप्स व पीसींमध्ये आढळून येणा-या पारंपारिक एचडीडी स्टोरेजपेक्षा ५ पट जलद इंटर्नल स्टोरेज ड्राइव्हची खात्री मिळते.

लक्षणीय बॅटरी बॅकअप:
५० डब्ल्यूएच उच्च-क्षमतेची बॅटरी असलेला इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओ लॅपटॉप क्लासमध्ये नोट्स, असाइनमेंट्स टाइप करण्यासाठी, नोट्स शेअर कण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत प्रकल्पांवर ग्रुप्ससोबत काम करण्यासाठी लॅपटॉप्सची गरज असलेल्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. हा लॅपटॉप विनाव्यत्यय जवळपास ११ तासांचे वेब ब्राऊजिंग, ९ तासांचे नियमित काम आणि ९ तासांचे व्हिडिओ प्लेबॅक देतो.

वजनाने हलका असण्यासह उच्च दर्जाचा व्युईंग अनुभव:
नवीन इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओ लॅपटॉपमध्ये अॅल्युमिनिअम अलॉई-आधारित मेटल बॉडी आहे, ज्यामुळे डिवाईसचे वजन फक्त १.३४ किग्रॅ आहे. तसेच १४.८ मिमी जाडी डिवाईसला विद्यार्थ्यांना सुलभपणे त्यांचे महाविद्यालय व शाळांमध्ये घेऊन जाण्यासाठी अत्यंत पोर्टेबल व टिकाऊ बनवते.

या लॅपटॉपमध्ये १४-इंच फुल एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह ३०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आणि १०० टक्के सुपर आरजीबी कलर रिप्रॉडक्शन आहे. यामुळे डिवाईस घर व कार्यालयीन वापरासाठी परिपूर्ण आहे. युजर्स मुलभूत गेम्स देखील खेळू शकतात आणि नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइम सारख्या सेवांमधून व्हिडिओ स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकतात.

इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओमध्ये व्हिडिओ कॉल्स व मीटिंग्ससाठी एचडी वेबकॅमसोबत द्विस्तरीय स्टिरिओ स्पीकर्स व प्रगत डीटीएस साऊंड तंत्रज्ञान आहे, ज्यामधून व्हिडिओ पाहताना किंवा गेम्स खेळताना सर्वोत्तम साऊंड अनुभवाची खात्री मिळते. पण युजर्सना अंधुक प्रकाशात देखील वैयक्तिक व्हिडिओ कॉल्स किंवा झूम मीटिंग्स घेण्यासाठी लॅपटॉपमध्ये ड्युअल-स्टार लाइट कॅमेरा वैशिष्ट्य आणि टाइपिंग करताना सुधारित दृश्यमानतेसाठी बॅकलिट कीबोर्ड आहे. या लॅपटॉपमध्ये विविध कनेक्टीव्हीटी पोर्ट्स आहेत, जसे दोन यूएसबी ३.० पोर्ट्स, डेटा ट्रान्सफरसाठी दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट व फुल फंक्शनसाठी एक पोर्ट, एचडीएमआय १.४ पोर्ट, एसडी कार्ड रीडर आणि ३.५ मिमी हेडरेस्ट व मायक्रोफोन कॉम्बो जॅक.

Infinix Laptop Inbux X Nio Launch


Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवार, २५ जुलैचे राशिभविष्य

Next Post

ईव्हीयमने लॉन्च केल्या या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; एवढी आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

Next Post

ईव्हीयमने लॉन्च केल्या या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; एवढी आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group