इंडिया दर्पण वृत्तसेवा – टाटा सन्स उद्योग समुहाचे माजी प्रमुख आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्याविषयी फार कमी माहिती सर्वांसमोर येते. टाटा हे अनेकांना ग्रेट वाटतात. पण ते तसे का आहेत, याचे उत्तर मिळतेच असे नाही. पण, आज आपण त्यांच्याविषयी अशी माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे त्यांच्याविषयीचा आदरही वाढेल आणि तुम्हाला एक नवा विचारही मिळेल.
दैनंदिन जीवनात प्रत्येकालाच नोकरी व्यवसाय करावा लागतो. म्हणजे पोटासाठी काहीतरी काम करणे आवश्यक ठरते, परंतु कामगार कायद्यानुसार असो की आणखी काही कामाचे तसे ठरलेले असतात त्यानुसारच प्रत्येक जण काम करतो. परंतु काही कार्यालयात किंवा कंपनीमध्ये कामचोर किंवा कामचुकार माणसे देखील असतात. मात्र काही उत्साही करून १२ तास काम करतात. इतकेच नव्हे तर काहीजण १८ तास देखील काम करू शकतात, असे म्हटले जाते. परंतु इतके काम करणे शारीरिक किंवा मानसिक आरोग्यासाठी योग्य आहे का? या संदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी बॉम्बे शेव्हिंग कंपनीची एक पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्ट मध्ये त्यांनी कंपनीत काम करण्यासाठी येणाऱ्या फ्रेशर्सला तब्बल 18 तास काम करण्याचा सल्ला दिला. या पोस्टवरून बराच गदारोळ माजला होता. काहींचं असं म्हणणं होतं की 18 तास काम करणं कोणाला शक्यच नाही. तर काहींचं असं म्हणणं होतं की १८ तास फ्रेशर असताना काम करायला हरकत नाही. याच विषयावर रतन टाटांचे व्यवस्थापक शंतनू नायडू यांनी आपलं मत मांडले. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यात शंतनू नायडू यांनी अशा गोष्टी बोलून दाखवल्या ज्याबाबत आपण विचार करायची खरंच गरज आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या एका व्हिडीओ मध्ये एक तरूण मुलगा दिसून आला. हा मुलगा रतन टाटांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक भरवताना दिसला. यानंतर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. मुलाचा शोध घेतला गेला. हा तरूण मुलगा रतन टाटांचा व्यवस्थापक तथा मॅनेजर होता. त्यातच याच शंतनू नायडूचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात फ्रेशर्सने १८ तासांचं काम करायला हवं असा सल्ला देणाऱ्या बॉम्बे शेव्हिंग कंपनीला त्याने चांगलेच उत्तर दिले आहे.
शंतनू म्हणतो, “आपण माणूस आहोत. माणूस म्हणून आपली किंमत कामापेक्षाही जास्त आहे. कामाची किंमत आपल्यापेक्षा जास्त नाही.” १८ तास काम केल्याने माणसाची उपलब्धता आणि उत्पादकता दोन्ही कमी होऊ शकते.” शंतनू हसल कल्चरला प्रोत्साहन देत नाही. ” नातेसंबंध आणि प्रेम आपल्याला माणूस बनवतात. काम आपल्याला माणूस बनवत नाही. तरीही ज्याला झोप न घेता १८-१८ तास काम करायची इच्छा असेल त्याला ते स्वातंत्र्य आहे. पण तरुण आणि उत्साही फ्रेशर्स मध्ये अशा पद्धतीचा प्रचार करणं चांगली कल्पना नाही.” असंही तो म्हणाला. लिंक्ड इन वरचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. यात शंतनूच्या विचारांना नागरिकांची चांगलीच वाह वाह मिळाली असून याबाबत शंतनू पुढे म्हणाला की, मला असे वाटते की शेवटी, कुटुंब, नाती, प्रेम हे महत्त्वाचं आहे. या गोष्टी आपण काम करताना मागे सोडून देतो. असेही शंतनू म्हणतात.
Industrialist Ratan TaTa Life Journey Thoughts Behavior