नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादा चोर चोरी करतो. पण, ती किती असते. तर, त्याच्या हव्यासाऐवढी. पण, एका चोराचा बायोडाटा पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. कारण, या चोराच्या बायोडाटामध्ये लिहिले आहे की, त्याने चक्क ५ हजार कार चोरल्या आहेत. वर्षाकाठी तो सरासरी १८५ कार चोरत होता. आता तो जेरबंद झाला असून त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत.
जीवनात प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो, अर्थात छंद विधायक असेल तर त्याचा स्वतःसाठी आणि समाजाच्या विकासासाठी फायदा होऊ शकतो. परंतु छंद किंवा नाद वाईट असेल तर त्यामुळे स्वतःचे त्याचबरोबर समाजाचेही पर्याय देशाची नुकसान होऊ शकते, अशाच एका तरुणाला आगळावेगळा आणि वाईट छंद होता, तो म्हणजे कार चोरीचा त्यातून त्याने सुमारे ५ हजार पेक्षा जास्त कार चोरी केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात मोठ्या कार चोराला अखेरीस अटक करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्या मागावर पोलीस होते. अखेरीस आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अनिल चौहान (वय ५२) असे या देशातील सर्वात मोठ्या कार चोराचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर 5000 कार चोरींचे गुन्हे दाखल आहेत. अनिल चौहान याने या कार चोरींच्या पैशातून दिल्ली, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यात अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. तसेच अत्यंत चैनीत तो जीवन जगत होता. त्याला 3 बायका आहेत आणि सात मुले आहेत. अटक करण्यात आलेला अनिल चौहान हा देशातील सर्वात मोठा कार चोर होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
विशेष म्हणजे त्याने २७ वर्षांत ५ हजार कार चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच वर्षाला तो सरासरी १८५ कार चोरी करीत होता. सेंट्रल दिल्ली पोलिसांना त्याच्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर देशबंधू गुप्ता रोडवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सहा बंदुका आणि सात काडतुसे जप्त केली आहेत. खरे म्हणजे दिल्लीच्या खानपुरा परिसरात राहत असलेला अनिल आधी रिक्षा चालवण्याचे काम करीत होता. सन 1995 नंतर त्याने कार चोरण्यास सुरुवात केली. २७ वर्षांत त्याने सर्वाधिक कार या मारुती 800 मॉडेलच्या चोरल्या आहेत. अनिल देशातील वेगवेगळ्या परिसरातून कार चोरुन त्यांना नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात पाठवीत होता. या चोरीसाठी त्याने अनेक टॅक्सी ड्रायव्हरांचे बळीही घेतले आहेत.
नवी दिल्ली मुंबई सारख्या शहरात राहिलो तर आपण पकडले जाऊ या दाकाने तो देशाच्या सीमा वरती भागात म्हणजे तो असामला शिफ्ट झाला. कार चोरीतून मिळवलेल्या पैशांतून त्याने दिल्ली, मुंबई आणि पूर्वोत्तर राज्यांत मालमत्ता खरेदी केल्या. तो आसाममध्ये जाऊन सरकारी कॉन्ट्रॅक्टर झाला. तिथे तो स्थानिक नेत्यांच्याही संपर्कात होता. कार चोरीतील हा आरोपी सध्या हत्यारांच्या तस्करीत सामील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातून हत्यारे आमून ती पूर्वोत्तर राज्यात बंदी असलेल्या संघटनांना पुरवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ईडीने त्याच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे.
महत्वाचे म्हणजे अनिलला यापूर्वीही अनेकदा अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सन २०१५ मध्ये त्याला एकदा काँग्रेस आमदारासोबत अटक करण्यात आली होती. त्यावेळी पाच वर्षे तो जेलमध्ये होता. २०२० मध्ये त्याची सुटका करण्यात आली. त्याच्याविरोधात १८० गुन्हे दाखल आहेत. आता तरी त्याला अटक केल्याने अनेकांच्या कार सुरक्षित राहते अशी आशा करायला हरकत नाही.
Delhi Police Arrest India’s Big Car Thief