इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशुब महिंद्रा यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी आज निधन झाले. १९६२ ते २०१२ अशी ४८ वर्षे ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. सध्या त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा या पदावर आहेत. नाशिकमधील महिंद्राचा कारखाना साकारण्यात आणि या कारखान्याशी केशुब महिंद्रा यांचे मोठे ऋणानुबंध आहेत.
अगदी अलीकडे, फोर्ब्सने १.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह त्यांना भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश म्हणून घोषित केले. केशुब महिंद्रा यांच्या निधनाची माहिती शेअर करताना, इन्स्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सांगितले की, व्यवसाय जगताने आज आपल्या महान व्यक्तींपैकी एक, केशुब महिंद्रा गमावला आहे. त्याला भेटणे नेहमीच छान होते. व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सामाजिक गोष्टींची उत्तम सांगड घालण्याची प्रतिभा त्यांच्यात होती.
केशुब महिंद्रा यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर १९४७ मध्ये महिंद्रा समूहात सामील झाले. त्यानंतर १९६३ मध्ये ते या ग्रुपचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने यशाची शिखरे गाठली. ४८ वर्षे अध्यक्षपद भूषवल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी हे पद त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवले. यासोबतच केशुब महिंद्रा हे टाटा स्टील, सेल, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या बोर्डातही होते.
१९८७ मध्ये, फ्रेंच सरकारने केशुब महिंद्रा यांना व्यावसायिक जगतात दिलेल्या योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. याशिवाय केशुब महिंद्रा यांना अर्न्स्ट आणि यंग यांनी २००७ साली जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. केशुब महिंद्रा यांनी कंपनी कायदा आणि मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती (MRTP) आणि केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह विविध सरकारी समित्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. २००४ ते २०१० पर्यंत ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्यही होते.
नाशिक कारखान्याशी ऋणानुबंध
नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीने कारखाना सुरू केला ते केशुब महिंद्रा यांच्यामुळेच. त्यांनीच निर्णय घेतला होता. भूमीपूजनासह विविध कार्यक्रमांवेळी ते या कारखान्यात आले होते. महिंद्राच्या स्कॉर्पिओ या कारचे लॉचिंगही त्यांच्या हस्ते झाले होते. ही कार भारतातच नाही तर जगभरातच नावाजली आहे. नाशिकमधील कामगार संघटना आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.
The industrial world has lost one of the tallest personalities today. Shri Keshub Mahindra had no match; the nicest person I had the privilege of knowing. I always looked forward to mtgs with him and inspired by how he connected business, economics and social matters. Om Shanti.
— Pawan K Goenka (@GoenkaPk) April 12, 2023
Industrialist Keshub Mahindra Death Oldest Billionaire