नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक धनंजय बेळे यांची निवड करण्यात आली आहे. धर्मदाय उपायुक्तांनी निवडलेल्या २१ विश्वस्तांची आज निमामध्ये बैठक झाली. त्यात अध्यक्षपदी बेळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निमा या संस्थेला पुनर्वेभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार यावेळी सर्व विश्वस्तांनी केला.
निमा संस्थेवर गेल्या काळात प्रशासक राज होते. त्यानंतर धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आणि २१ जणांची विश्वस्तपदी निवड केली. उद्योगांच्या हितासाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारी निमा ही संस्था पुन्हा कार्यरत झाली आहे. नवनियुक्त विश्वस्तांची आज निमात बैठक झाली. आणि या बैठकीत धनंजय बेळे यांची निवड करण्यात आली. तसेच, पूर्वीप्रमाणेच निमाचे कार्य सुरू व्हावे, अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली.
निमाचा कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी नवीन विश्वस्थांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यानुसार पुढील कायदेशीर तरतुदीची सविस्तर माहिती होण्यासाठी ज्येष्ठ वकील सिकंदर सैयद यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले. निमाचा पुढील सर्व कारभार हा १९८३ रोजी मंजूर करण्यात आलेल्या घटनेनुसार होणार असल्याने नवीन ६ पदाधिऱ्यांची निवड लवकरच करण्यात येणार आहे यात अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, खजिनदार, मानद सरचिटणीस, सह सचिव अशी पदाधिकाऱ्यांची संख्या असणार आहे. आज झालेल्या बैठकीत निमाच्या पुढील कारभार सुरळीत चालण्यासाठी सर्वानुमते प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही सर्वानी दिली.
यावेळी निमास ज्येष्ठ उदयोजक स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स चे सौमित्र कुलकर्णी यांनी ५१००० रु. देणगी दिली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमाचा कारभारात सुसूत्रता व पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी तसेच सर्व सभादांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी गोविंद झा, जितेंद्र आहिरे, जयंत जोगळेकर, मिलिंद राजपूत, संदीप भदाणे, किशोर राठी, सुधीर बडगुजर, संजय सोनावणे, राजेंद्र वडनेरे, विरल ठक्कर, सुरेंद्र मिश्रा, सुकुमार नायर, श्रीधर व्यवहारे, नितीन वागस्कर मनीष रावल, रवींद्र झोपे, वैभव जोशी व राजेंद्र आहिरे उपथित होते.
Industrialist Dhananjay Bele Appointed as Chairman Nima
Nashik NIMA Trustee Appointed by Charity Commissioner
Nashik Industries Manufacturers Association