इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात क्रिप्टोकरन्सीची क्रेझ वाढते आहे. पण, त्यातील संभाव्य धोके ओळखून भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षाच्या अखेरीस डिजिटल चलनाची सुरुवात केली. अद्याप देशाच्या सर्वच भागात हे चलन सुरू होऊ शकले नाही. मोजक्याच शहरांमध्ये ही सुविधा पथदर्शी स्वरूपात सुरू आहे. काही बँकां आणि विक्रेत्यांपुरताच तो मर्यादित आहे. मुंबईत ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी डिजिटल रुपयाद्वारे डाळिंब खरेदी केले.
डिजिटल रुपया पथदर्शी प्रकल्पांतर्गत मूळचे बिहारचे असणारे आणि मुंबईत फळ विक्री करणारे बच्चेलाल सहानी व आरबीआय मुख्यालयासमोर चहा विक्री करणारे राजस्थानचे जगदीश पटेल यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आनंद महिंद्रासुद्धा डीजिटल व्यवस्थेचा भाग झाले आहेत. त्यांनी सहानी यांच्याकडून डाळिंब खरेदी केले आणि रोख रक्कम न देता डिजिटल रुपयात पेमेंट केले. महिंद्रा यांनी त्यांचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे.
दीड हजारांचे पेमेंट जमा
सहानी 29 वर्षांपासून मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयासमोर फळ विक्रीचा व्यवसाय करतात. आरबीआयने त्यांना डिजिटल रुपया पथदर्शी प्रकल्पात सहभागी करुन घेतले. आरबीआयने त्यांना डिजिटल रुपयाचा क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे खाते आयडीएफसी फर्स्ट बँकेत उघडण्यात आले. त्यांना या खात्यात ई-रुपयाच्या व्यवहाराची रक्कम प्राप्त होत आहे. आतापर्यंत सहानी यांच्या खात्यात जवळपास दीड हजार रुपयांचे डिजिटल पेमेंट जमा झाले आहे.
चार शहर आणि चार बँका
पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपयाची सुरुवात झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि आडीएफसी फर्स्ट बँकेच्या मागणीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 2022 मध्ये पहिल्याच दिवशी या बँकांना एकूण 1.71 कोटी रुपयांचे डिजिटल चलन जारी केले. पुढे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा या बँकाही या प्रकल्पात करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोच्ची, लखनऊ, पाटणा आणि शिमल्यात डिजिटल रुपयाद्वारे देवाण घेवाण सुरू होईल.
https://twitter.com/anandmahindra/status/1618177796882444288?s=20&t=GfRNtDsXwlevSE6ZcpyjBQ
Industrialist Anand Mahindra Digital Payment Video