इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडोनेशिया मध्ये फुटबॉल सामना सुरू असताना दोन गटात अचानक तुफान हाणामारी सुरू झाली. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत आणि पोलिसांच्या लाठीमारात सुमारे १३० जणांचा बळी गेला. तर, १७०हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल सर्वत्र खळबळ उडाली असून या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
फुटबॉल सामना हिंसाचारातील मृतांची संख्या १७४; शेकडो जण गंभीर जखमी (Video) https://t.co/pbUsCSgAuU
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) October 2, 2022
इंडोनेशियाच्या एका मैदानावर फुटबॉलचा सामना रंगला होता. या सामनादरम्यान दोन्ही बाजूचे संघ चांगलीच टक्कर देत होते. त्याचबरोबर सामना बघण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते, मात्र अचानक दोन्ही गटांमध्ये काहीतरी गोंधळ आणि वादावादी झाली. त्याचप्रमाणे मैदानावर खेळाडू देखील एकमेकाला भिडले, आणि मग त्यातून प्रचंड गोंधळ सुरू झाला. अचानक सामन्यातील दोन क्लबचे समर्थक आपसात भिडल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलीस येण्याच्या आतच मैदानावर मोठा हिंसाचार उफाळून आला. दोन्ही गटाचे समर्थक ऐकमेकांना तुफान धुक्काबुक्की आणि मारहाण करत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस व सुरक्षारक्षकांनी मैदानात धाव घेतली. वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र वाद अधिक चिघळल्याने अखेर पोलिसांनी लाठीमार सुरू केला.
https://twitter.com/KJ00355197/status/1576444484954603520?s=20&t=voARkrUInXhwxk21zU89Qw
आधीच दोन्ही गटाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. त्यातच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली. वास्तविक काही पोलीस हे ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि महिलांना वाचवण्यासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काही गुंडगिरी करणाऱ्या समर्थकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की सुरू केली. त्यातून पोलीस संतप्त झाले. या सर्व गोंधळामध्ये सुमारे १३० जणांचा मृत्यू तर १७० जण जखमी झाल्याचे कळते. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचवेळी काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ देखील काढले. हे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. मैदानात पोलीस दाखल होताच दोन्ही गटाचे समर्थक वाट दिसेल तिकडे पळताना दिसत असल्याचे व्हिडिओतून दिसते आहे.
129 killed in riot & stampede at football match in Indonesia after home team’s loss to arch rival in East Java pic.twitter.com/aIJiILHiyM
— Shiv Aroor (@ShivAroor) October 2, 2022
Indonesia Football Match Riot 130 Death 170 Injured
Sports Crime