पुणे – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड वाढत्या किमती पाहता भारतात सीएनजी कारची मागणी वाढली आहे. तसेच भविष्यात पेट्रोल डिझेलचे नैसर्गिक साठे कमी होऊन ते बंद देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे या इंधनावरील वाहने अधिक प्रदूषण करतात, याउलट सीएनजी असलेली वाहने कमी प्रदूषण करतात आणि सीएनजीच्या गाड्या अधिक फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळेच आता बहुतांश ग्राहक सीएनजी कार घेण्याचा विचार करत आहेत.
आपण देखील बचत किंवा पैसे वाचवण्यासाठी सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर काही चांगल्या ऑफर्स आहेत. या कारमध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या काही फॅक्टरी फिट सीएनजी कार आहेत. त्या उत्तम मायलेज देतात. तसेच सीएनजी कारच्या किमती जवळपास निम्म्याने कमी झाल्या आहेत. आता काही चांगले मायलेज देणार्या कारची माहिती जाणून घेऊ या..
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकीची वॅगन आर कार ही एक व्यावहारिक पर्याय आहे, कारण ही कार कोणत्याही वयोगटातील कोणीही चालविण्यास सोयीस्कर मानली जाते. वॅगन आर CNG-किट पर्यायामध्ये किफायतशीर 998cc पेट्रोल मोटरसह येते, जी मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे आणि कठीण परिस्थितीत 32.52 kmpl मायलेज मिळवू शकते. सध्या वॅगन आर सीएनजी प्रकार फक्त LXi आणि LXi(O) ट्रिमसह उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 89 हजार रुपये आहे.
ह्युंदाई ग्रँड i10 Nios
ही कार देखील CNG मध्ये एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये रिव्हर्स कॅमेरा, ABS, EBD, मागील A/C व्हेंट्स, पुढील आणि मागील पॉवर विंडो आणि इलेक्ट्रॉनिक्स समाविष्ट आहेत. तसेच 1.2-लिटर पेट्रोल इंजिन थोडी जास्त शक्ती (65 bhp) देते. मायलेज, पुरेसे म्हणजे 18.9 kmpl आहे. या कारची एक्स-शोरूमनुसार किंमत 7 लाख 53 हजार रुपये आहे.
मारुती अर्टिगा
मारुतीची MPV कार Ertiga देखील CNG मध्ये खरेदी करू शकता. त्याचे CNG मायलेज 26.08 kmpl आहे. या कारच्या CNG प्रकाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9,66,500 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो
मारुती सुझुकी S-Presso ची SUV सारखी रुंदी असून ती सर्वांना नक्कीच आकर्षित करेल. याला 58bhp ची पॉवर मिळते. ही कार 32.2 किमी/किलो मायलेज देत असून सर्वोत्कृष्ट मायलेजपैकी एक आहे, तसेच ही कार चालवणे खूप सोपे आहे. एक्स-शोरूमनुसार त्याची किंमत 5 लाख 37 हजार रुपये आहे.
मारुती सुझुकी Eeco
सीएनजी कारच्या पर्यायातही ही एक चांगली कार पाहता येईल. CNG पर्याय फक्त 5-सीट कॉन्फिगरेशनसह उपलब्ध आहे. तसेच किफायतशीर 1198cc पेट्रोल मोटरद्वारे देण्यात येत आहे. ही कार 19.2 किमी/किलो मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम नुसार किंमत 5 लाख 6 हजार रुपये आहे.