India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देशातील सर्वात मोठा पेट महोत्सव मुंबईत या तारखेपासून; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट फेड इंडिया हा देशातील पाळीव प्राणी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित केला जाणारा सर्वांत मोठा पेट महोत्सव आहे. या दोन दिवसांचा महोत्सव जानेवारी २१ व २२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईतील गोरेगाव येथील नेस्कोमध्ये होणार आहे.

कॅरी माय पेट ही कंपनी पेट फेड इंडियाची ट्रॅव्हल पार्टनर तर आहेच, शिवाय या कंपनीने पाळीव प्राण्यांच्या स्थलांतर प्रक्रियेबद्दल पालकांना शिक्षित करण्यासाठी अनेकविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. पाळीव प्राण्यांच्या स्थलांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहतूकीच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल यात माहिती दिली जाणार आहे. तसेच पालकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. पाळीव प्राण्यांच्या पालकांना कंपनी देत असलेल्या सेवेची कल्पना यावी म्हणून ठेवलेले मिनिएचर विमान त्यांच्या स्टॉलवरील प्रमुख आकर्षण असेल.

नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या पेट फेड बेंगळुरूमध्ये व डिसेंबर महिन्यात झालेल्या पेट फेड दिल्लीमध्ये कॅरी माय पेटचा सहभाग यशस्वी ठरला होता. दोन्ही शहरांमध्ये कॅरी माय पेटच्या स्टॉलला ७०००हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली. पेट फेड मुंबईसाठीही कंपनीने त्याच प्रकारच्या मॉडेलचे नियोजन केले आहे; यामध्ये प्रवासाच्या प्रक्रियेचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रात्यक्षिक दाखवले जाते. सहभागी अभ्यागतांना मॉक बोर्डिंग पास देणे, पाळीव प्राण्यांना लुटुपुटूचे ‘फिट-टू-फ्लाय’ प्रमाणपत्र देणे आदींच्या माध्यमातून ही प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली जाते आणि अखेरीस पाळीव प्राण्यासोबत विमानात जाण्यातून त्यांना पाळीव प्राण्याच्या स्थलांतराचा खराखुरा अनुभव दिला जातो. कॅरी माय पेट या दिल्लीस्थित पाळीव प्राणी वाहतूक ब्रॅण्डने ६०००हून पेट रिलोकेशन्स पूर्ण केली आहेत. यांमध्ये ७२०० पाळीव प्राण्यांचे देशांतर्गत तसेच ३०हून अधिक देशांत जागतिक स्थलांतर करण्यात आले आहे.

India’s Biggest Pet Festival in Mumbai


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …ही अधिक बलशाली शक्ती आहे

Next Post

सावधान! सोसायटीतील लिफ्टविषयी हलगर्जीपणा नको; दिल्ली परिसरात ३ घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सावधान! सोसायटीतील लिफ्टविषयी हलगर्जीपणा नको; दिल्ली परिसरात ३ घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group