नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, वेळेवर न धावणाऱ्या रेल्वे आणि धीमी गती या दोन मुख्य तक्रारी प्रवाशांचा आहेत. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. त्यामुळेच प्रवाशांना आता सुखद धक्का देण्यात आला आहे. रेल्वेने काही गाड्यांचा वेग वाढविला आहे. तसेच, काही गाड्या या वेळेतच असल्याची बाब समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने १ ऑक्टोबरपासून “ट्रेन्स ॲट अ ग्लान्स (TAG)” म्हणून ओळखले जाणारे आपले नवीन अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जारी केले आहे. हे वेळापत्रक १ ऑक्टोबरपासून भारतीय रेल्वेच्या www.indianrailways.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नवीन वेळापत्रकात, सुमारे ५०० मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गाड्यांचा वेग १० मिनिटे ते ७० मिनिटांपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, १३० रेल्वेगाड्या (६५ जोड्या) अधिक वेगवान करून सुपरफास्ट श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व गाड्यांच्या सरासरी वेगात सुमारे ५ % वाढ झाली आहे ज्यामुळे अधिक गाड्या चालवण्यासाठी जवळपास ५ % अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाले आहेत. २०२२-२३ या वर्षात भारतीय रेल्वेच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा सुमारे ८४% आहे. जो २०१९-२० मध्ये गाठलेल्या सुमारे ७५%पेक्षा सुमारे ९% अधिक आहे.
विस्तृत वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,537,2789
Indian Railway Passengers Good News Time
Train Delay Speed Increase