पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वेने विविध पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत केली जाणार असून २४२२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
आपल्याकडे चांगली नोकरी असावी, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यात सरकारी नोकरी, रेल्वे विभागात नोकरी मिळाली तर तो आनंद वेगळाच असतो. अशी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २४२२ पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत अधिसूचनेद्वारे उमेदवार महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, निवड निकष आणि इतर तपशील तपासू शकतात. या पदांसाठी १७ जानेवारी २०२२ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (१० अधिक २ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही गुणवत्ता यादीवर आधारित असेल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवार १६ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना त्यांची स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.