India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यंदा पाऊस कसा राहणार? ‘या’ तारखेपासून दाखल होणार; हवामान विभागाने जाहीर केला दुसरा अंदाज

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in मुख्य बातमी
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा एल निनोचा प्रभाव असला तरी २०२३ मध्ये मान्सून सामान्य राहील, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने आज मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे.

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. हे सलग पाचवे वर्ष आहे जेव्हा भारतात मान्सून सामान्य असेल. देशात मान्सूनचा हंगाम जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आगामी नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल, अशी भीती यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. यासोबतच वेगवेगळ्या प्रदेशात पावसाचे असमान वितरण होत असल्याचेही सांगण्यात आले. पॅसिफिक महासागरात एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची चर्चा होती, मात्र आता मान्सून सामान्य राहणार असून एल निनोचा फारसा परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष हवामान विभागाच्या दुसऱ्या अंदाजाकडे लागून होते. मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वी हा अंदाज जाहीर केला जातो. सर्वसामान्यपणे हा अंदाज जवळपास अचूक असतो असा समज आहे. आणि आता देशात ९६ टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Indian Meteorological Department Monsoon Forecast IMD


Previous Post

धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारचे वाचवले तब्बल १०८ कोटी रुपये… संपूर्ण राज्यात चर्चा…

Next Post

धक्कादायक! मृत ठरविलेला ‘तो’ जळीत रुग्ण थेट उठून बसला…. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार

Next Post

धक्कादायक! मृत ठरविलेला 'तो' जळीत रुग्ण थेट उठून बसला.... नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group