बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय जवानांनी रक्तदान करून जीव वाचविलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा अखेर मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 4, 2022 | 9:46 pm
in संमिश्र वार्ता
0
Capture 15

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर शत्रू किंवा वैरी असले तरी सिमेवर दोन्ही बाजूंनी सुरक्षा करणारे लष्करी जवान हे डोळ्यात तेल घालून पहारा करत असतात. परंतु पाकिस्तान मधून काही वेळा घुसखोरी करून दहशतवादी भारतात येण्याचा प्रयत्न करतात, असाच एक दहशतवादी भारतात आला असता तो जखमी झाला, मात्र त्याला वाचविण्याचा भारतीय लष्कराने प्रयत्न देखील केला मात्र दुर्दैवाने त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला रक्त देऊन भारतीय जवानांनी त्याचे प्राण वाचवले होते. आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले. मागील महिन्यात 21 ऑगस्ट रोजी नौशेराच्या झांगर सेक्टरमध्ये भारतीय जवानांना तीन दहशतवादी दिसले. त्यांतील एकजण नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौकीजवळ येऊन संरक्षक तार तोडण्याचा प्रयत्न करीत होता.
जवानांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोळीबारानंतर एकाला जिवंत पकडण्यात आले; तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळी लागून हा दहशतवादी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल देवेंद्र यादव यांनी दिली होती.

उपचार करून ही आता त्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळली आहे. तबारक हुसैन असं या दहशतवाद्याचं नाव असून चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला होता. तसेच हुसैन पाक व्याप्त काश्मीरातील सब्जकोट गावचा रहिवासी असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे कर्नल युनूस चौधरी यांनी त्याला भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यासाठी 30 हजार पाकिस्तानी रुपये दिले होते, असे तो म्हणाला होता. तसेच मला बाकीच्या दहशतवाद्यांनी धोका दिला असून त्यामुळे मी पकडला गेलो.  माझे सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाले असून, पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा व जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या अनेक शिबिरांत मी गेलेलो असंही सांगितलं होतं. खरे तर तो जीवन-मरणाच्या सीमेवर होता. भारतीय जवानांनी रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले. एवढेच नाहीतर त्याला आपल्या हाताने जेवण भरवले, असे ब्रिगेडियर राणा म्हणाले होते. मी मरण्यासाठी आलो होतो, मला धोका देण्यात आला. मला येथून बाहेर काढा, असे हुसैन अटकेवेळी ओरडत होता, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

Indian Jawan Blood Donation Pakistan Terrorist Death
Jammu Kashmir

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ सप्टेंबर २०२२

Next Post

या व्यक्तींना आज मिळेल यश प्राप्तीचा समाचार; जाणून घ्या सोमवार, ५ सप्टेंबरचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज मिळेल यश प्राप्तीचा समाचार; जाणून घ्या सोमवार, ५ सप्टेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011