होळी- हुताशनी पौर्णिमा
फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी करण्याची पद्धत आहे. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक पाळले जाते. या आठ दिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
होळीची पौराणिक कथा
राजा हिरण्यकश्यप हा प्रथमपासूनच देवांच्या विरोधी होता. त्यातच त्याला विशिष्ट परिस्थितीत कोणीही मारू शकणार नाही असा ब्रह्मदेवाचा वर प्राप्त होता. आपल्या राज्यात कोणीही कुठल्या देवाचा जप अथवा भक्ती करायची नाही, असे फर्मान त्याने काढले होते. असे असतानाही त्याचा पुत्र प्रल्हाद हा मात्र विष्णू भक्तीत तल्लीन असायचा. विष्णूचे नाम घ्यायचा. आपला मुलगा असूनही विष्णू भक्त प्रल्हाद याला मारण्याचे हिरण्याकष्यपचे विविध प्रयत्न फसल्यानंतर त्याने आपली बहिण होलिका हिला पाचारण केले.
होलिकेला देखील भगवान शंकराने तिच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येमुळे एक दिव्य वस्त्र प्रदान केले होते. हे वस्त्र अंगावर घेतल्यानंतर होलिकेला अग्नीपासून भय राहणार नव्हते. प्रल्हादाला मारण्याच्या हेतूने हिरण्यकश्यपने आपली बहिण होलिका हिला दिव्य वस्त्र अंगावर परिधान करुन प्रल्हादाला सोबत घेऊन अग्नी मध्ये प्रवेश करण्यास सांगितले.
अग्नीमध्ये प्रवेश करताच होली के च्या अंगावरील दिव्य वस्त्र प्रल्हादाच्या अंगावर येऊन पडले व त्या अग्नीमध्ये होलिका नष्ट झाली. परंतु प्रल्हाद मात्र अग्नीतून सहिसलामत बाहेर आला. पुढे हिरण्यकश्यपूचा वध भगवान विष्णूंनी नरसिंह रूपात केला. अग्नीमध्ये दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचे प्रतिक म्हणून होळी सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींचा अग्नीमध्ये नाश झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरोघरी होळीसाठी गोडधोडाचा नैवेद्य केला जातो. अनेक ठिकाणी होळीचा अथवा दुसरा दिवस धुळवड किंवा रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो.
होळीचा मुहूर्त
सायंकाळी ६.४४ पासून रात्री ८.५३ पर्यंत आहे.
Indian Festival Tradition Holi Importance Muhurta