मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघात अनेक तरुण खेळाडू चांगली कामगिरी करतात त्यापैकीच एक म्हणजे ऋषभ पंत. मधल्या फळीत भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये दिल्ली क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्स कडून तो खेळतो. डिसेंबर २०१५ला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक आणि २०१६ साठी त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश झाला. टी२० संघात त्याची निवड होण्यासंदर्भात संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठे विधान केले आहे.
डिसेंबर २०१५ला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ साठी त्याच्या नावाचा समावेश भारतीय संघात झाला. मालिके दरम्यान, दि.१ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतने वेगवान असे फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. जानेवारी २०१७ला त्याने आंतरराष्ट्रीय टी२० भारतीय संघात पदार्पण केले, ऑगस्ट २०१८ला कसोटी सामना, आणि ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला. या मॅचच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंतला संधी मिळाली नव्हती. त्यावरुन बरीच चर्चा झाली. ऋषभ पंत टीम इंडियाची पहिली पसंत आहे, असा एक समज होता. कारण तो वनडे, टेस्ट आणि टी 20 तिन्ही फॉर्मेट मध्ये खेळतो. त्यामुळे त्याला वगळल्यानंतर प्रश्न विचारलं जाणं, स्वाभाविक होतं. पण आता टी 20 फॉर्मेट मध्ये ऋषभ पंतच डिमोशन झाल्याचे दिसून येते.
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आज पुन्हा एकदा भारतीय संघ मैदानात उतरेल. या सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला ऋषभ पंतबद्दल सांगितले की, तो यष्टीरक्षकासाठी पहिला पर्याय नाही. पाकिस्तानविरुद्धच्या (भारत विरुद्ध पाकिस्तान) गेल्या सामन्यात पंत संघाबाहेर होता. तर हाँगकाँगविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
टी-20 विश्वचषकाचा उल्लेख करताना राहुल द्रविड म्हणाला, “संघात प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक नाही. आम्ही परिस्थिती, मैदानाची परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी संघानुसार खेळतो आणि त्यानुसार सर्वोत्तम इलेव्हन निवडतो. प्रत्येक स्थानासाठी प्रथम पसंतीची प्लेइंग इलेव्हन असू शकत नाही. ते बदलेल. त्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध, आम्हाला वाटले की दिनेश कार्तिक आमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
राहुल द्रविड यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. टी 20 क्रिकेट मध्ये ऋषभ पंतला पहिली पसंती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंत शिवाय भारतीय संघात दिनेश कार्तिकच्या रुपात सीनियर विकेटकीपर उपलब्ध आहे. आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यात तो संघाचा भाग होता. “संघामध्ये कोणीही पहिल्या पसंतीचा विकेटकीपर नाहीय. आम्ही परिस्थिती, मैदानावरची स्थिती आणि प्रतिस्पर्धी कोण आहे? त्यानुसार खेळतो. सामन्यानुसारच प्लेइंग इलेव्हन निवडली जाते” असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.
प्रत्येक स्थितीसाठी पहिल्या पसंतीची अशी प्लेइंग इलेव्हन नसते. परिस्थिती, गरजेनुसार त्यात बदल होतील. त्यादिवशी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावेळी दिनेश कार्तिक योग्य पर्याय आहे, असं आम्हाला वाटले, असं राहुल द्रविड म्हणाले. टेस्ट आणि वनडे मध्ये ऋषभ पंतने संघात आपली जागा पक्की केली आहे. पहिली पसंती त्यालाच आहे. पण टी 20 फॉर्मेट मध्ये दिनेश कार्तिकच्या पुनरागमनाने त्याच्या अडचणी वाढवल्या आहेत. विशेष करुन या फॉर्मेट मध्ये आकड्यांची साथही ऋषभ पंतला नाहीय. 2022 मध्ये पंतने 13 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 260 धावाच केल्या आहेत. यात एक अर्धशतक आहे. पण स्ट्राइक रेट 135 चा आहे.
भारतीय संघ खालीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
Indian Cricket Team T20 Rishabh Pant Coach Rahul Dravid