इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी-२० विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने हार्दिक पांड्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे. संघाचे नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी सलामीवीर केएल राहुल देखील या दौऱ्याचा भाग असणार नाही. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी फिनिशरची भूमिका बजावणारे अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अश्विन यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
संघाची घोषणा करताना बीसीसीआयने सांगितले की या दौऱ्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल, तर ऋषभ पंत दोन्ही मालिकेत उपकर्णधार असेल. भारतीय संघ १८ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याने दौऱ्याची सुरुवात करेल. पहिला सामना वेलिंग्टन येथे होणार आहे. टीम इंडिया १८, २० आणि २२ नोव्हेंबरला टी२० आणि त्यानंतर २५, २७ आणि ३० नोव्हेंबरला एकदिवसीय सामने खेळणार आहे.
न्यूझीलंड टी२० साठी संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड एकदिवसीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
https://twitter.com/BCCI/status/1587069079596040193?s=20&t=qIJwgbboxS54Ci5B3TeXLg
न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होणार आहे. लोकेश राहुल १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडला जाणार नाही, परंतु डिसेंबरमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासह उपकर्णधार म्हणून बांगलादेशला जाईल. संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. त्याची लवकरच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी होणार आहे.
बांगलादेश एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकूर , मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल
https://twitter.com/BCCI/status/1587069763322204160?s=20&t=qIJwgbboxS54Ci5B3TeXLg
Indian Cricket Team New Zealand Bangladesh Tour