मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कमल पासी यांनी पंजाबसाठी काही क्रिकेट सामने खेळले आहेत. रविकांत सिंह आता भारतीय क्रिकेट योजनेच्या जवळपास नाहीत. आपल्या करिअरच्या चढत्या काळाच्या चार वर्षांनंतर मनजोत कालरा पुढील पातळीवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. हे सर्व खेळाडू १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघाचे सदस्य राहिले आहेत. परंतु वेळेसोबत आपली लय कायम ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. हा असा मुद्दा आहे, ज्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला गंभीरतेने काम करावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) या खेळाडूंचे भविष्य सावरण्यासाठी १९ प्लस (१९ वर्षांपेक्षा अधिक वयाचे) खेळाडूंना सोबत घेणार आहे. १९ वर्षांखालील खेळाडूंच्या पातळीवरील खेळाडू वय पार केल्यानंतरही क्रिकेटशी जोडले जावे हे सुनिश्चित केले जाणार आहे.
शेख रशीद (आंध्र प्रदेश), रवी कुमार (बंगाल), राज अंगद बावा (चंडीगढ), यश धुल (दिल्ली), हे असे खेळाडू आहेत, जे आपापल्या राज्यांच्या संघात जागा मिळवू शकतात. परंतु भारतात १९ वर्षांखालील अनेक खेळाडू ही पातळी आणि रणजी करंडकच्या मध्ये फसतील. भारतीय स्थानिक क्रिकेट प्रणालीमध्ये आधी राज्यस्तरावर २३ वर्षांखालील संघ असतो. परंतु त्यानंतर २५ वर्षांखालील संघ करण्यात आले. या श्रेणीत पूर्वीपासून अनेक दावेदार आहेत. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी भविष्यात भारताच्या वरिष्ठ संघासाठी विकसनशील खेळाडूंच्या एका पाचस्तरीय प्रणालीवर काम करू शकते. आता ती १६ वर्षांखालील वयोगटापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १९ वर्षांखालील, इमर्जिंग (राष्ट्रीय २३ वर्षांखालील) आणि अ संघाचा समावेश आहे. ते म्हणाले, यामध्ये १९ प्लस ची पातळी जोडण्याची योजना आहे. त्यामध्ये या सर्व मुलांना सहभागी करून घेण्याची शक्यता आहे. या सर्व पातळ्यांमध्ये बीसीसीआय २५ वर्षांखालील (आता राज्य ए संघाच्या स्वरूपात मानली जाते) संघातील मूळ रूपात वरिष्ठ खेळाडूंच्या संघात जागा न मिळवू शकणाऱ्या त्या खेळाडूंसाठी हे व्यासपीठ आहे.
१९ वर्षांखालील आणि या पातळीचे अंतर कमी करण्यासाठी १९ प्लस संघाच्या योजनेवर विचार करण्यात येत आहे. एनसीए परिसराच्या आत जेव्हा प्रथम श्रेणी पातळीवरील चार नव्या खेळपट्ट्या तयार होणार आहेत. तेव्हा अकादमीकडून आपला १९ प्लस संघ तयार करू शकणार आहे. हा संघ तिथे उपस्थित असलेल्या इतर संघांविरुद्ध सामने खेळू शकणार आहे. प्रशिक्षक, फिजिओ त्यांच्या प्रगतीवर नियमित देखरेख करू शकणार आहेत. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी १० राष्ट्रीय निवडकर्त्यांसह (पाच वरिष्ठ आणि पाच कनिष्ठ) एनसीएचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत एक आराखडा तयार करण्यासाठी चर्चा करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१२ च्या १९ वर्षांखालील संघातील हनुमा विहारी वगळल्यास बहुतांश खेळाडूंचा आपल्या राज्यांच्या संघांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थानिक खेळाडूंमध्ये समावेश नाही.