इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपांमुळे देशातील आणि जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचा थोडासा हादराही त्यांना घाबरवतो. दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, गुजरातमधील अमरेली जिल्हा हा सर्वात जास्त भूकंपग्रस्त क्षेत्र आहे. गेल्या दोन वर्षांत येथे भूकंपाचे तब्बल ४०० धक्के जाणवले आहेत.
सर्व हादरे सौम्य होते. हे भूकंप सामान्यतः अल्पकालीन असतात, परंतु ते दिवस, आठवडे किंवा कधीकधी महिने चालू राहू शकतात आणि अनेकदा त्याच ठिकाणी पुनरावृत्ती होतात, असे गांधीनगर स्थित इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्च (ISR)ने सांगितले आहे.
संस्थेचे तज्ज्ञ म्हणाले की, जेव्हा भूकंप पुन्हा-पुन्हा होतात तेव्हा हादरे सौम्य असतात. 400 भूकंपांपैकी 86 टक्के भूकंपांची तीव्रता दोन टक्क्यांपेक्षा कमी होती, तर 13 टक्के भूकंपांची तीव्रता दोन ते तीन इतकी होती. असे फक्त पाच भूकंप राहिले, जे तीनच्या वर गेले. ते म्हणाले, अनेक भूकंप असे होते की लोकांना ते जाणवलेही नाहीत. जेव्हा भूकंप मालिकेत होतात तेव्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता कमी असते, असे त्यांनी सांगितले.
शास्त्रज्ञांच्या मते, गुजरातच्या अमरेली जिल्ह्यासह बहुतेक सौराष्ट्र प्रदेश भूकंपाच्या झोन तीनमध्ये येतो, ज्याला मध्यम नुकसान जोखीम क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले जाते. अमरेलीतील फॉल्ट लाइन 10 किमी आहे, तर मोठ्या भूकंपासाठी फॉल्ट लाइन 60 ते 70 किमीपेक्षा जास्त असावी, असे ते म्हणाले. अमरेलीमध्ये वारंवार होणारे भूकंप हे टेक्टोनिक सेटअप आणि हायड्रोलॉजिकल लोडिंगमुळे हंगामी भूकंपाच्या क्रियाकलापांना कारणीभूत ठरतात, असे शास्त्रज्ञ सांगतात.
अमरेलीतील मितियाळा गाव हे सर्वाधिक भूकंपग्रस्त क्षेत्र ठरले आहे. या 400 पैकी अनेक भूकंपाचे धक्के येथे जाणवले आहेत. अशा परिस्थितीत, सावधगिरी म्हणून, नागरिकांनी घराबाहेर झोपण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या भूकंपाच्या घटनेत ते बचावू शकतील. 23 फेब्रुवारीला देखील अमरेलीच्या सावरकुंडला आणि खंबा तालुक्यात 3.1 ते 3.4 तीव्रतेचे चार धक्के जाणवले होते.
Indian City last 2 years 400 Earthquakes