India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गेट वे ऑफ इंडिया येथे आता शानदार ‘लाईट आणि साऊंड शो’; या दिवशी होणार उदघाटन

India Darpan by India Darpan
February 26, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शोचे आयेाजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली. कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

श्री. लोढा यांनी सांगितले, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाइट ॲण्ड साऊंड शोला 28 फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात येत आहे. प्रथम आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे शनिवारी आणि रविवारी शो होईल. शो आझादी का अमृत महोत्सव’ आणि प्रगतीशील भारत संकल्पनेवर आधारित आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान यावरही या शोच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

उद‌‌्घाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, इंडियन ऑइलचे निदेशक (विपणन) व्ही. सतीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव असा उपक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी आवाहन केले आहे.

Gate Way of India Light And Sound Show


Previous Post

भूकंपाने हादरले हे शहर.. २ वर्षात तब्बल ४०० वेळा धक्के… भीतीने सर्व नागरिक झोपतात घराबाहेरच… भारतातील कोणते शहर आहे हे

Next Post

मुख्यमंत्री शिंदे आहेत प्रकल्पग्रस्त… तरीही सुटेना पुनर्वसनाचा प्रश्न…. खुद्द मंत्री शंभुराजे देसाईंनी दिली कबुली

Next Post

मुख्यमंत्री शिंदे आहेत प्रकल्पग्रस्त... तरीही सुटेना पुनर्वसनाचा प्रश्न.... खुद्द मंत्री शंभुराजे देसाईंनी दिली कबुली

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group