मुंबई – सध्या भारतीय बाजारपेठेत नवनवीन अत्याधुनिक वाहने दाखल होत आहेत. त्यामुळे वाहन क्षेत्रासाठी सध्याचा सण-उत्सवांचा काळ अतिशय उत्साहवर्धक असणार आहे. दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि महिंद्राची बहुप्रतिक्षित शक्तिशाली एसयूव्ही XUV700 ही दोन नवीन वाहने बाजारात दाखल झाली आहेत. ही बाब बाजारपेठेला मोठा उत्साह देणारी आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर
देशातील आघाडीची कॅब सेवा देणारी कंपनी ओलाने पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरचे बुकिंगही सुरू झाले आहे. या स्कूटरला बूट स्पेस, अॅप-आधारित कीलेस अॅक्सेस आणि सेगमेंट-लीडिंग रेंज मिळणार आहे. तसेच ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर १५० किमीपर्यंत प्रवास करेल. तसेच १०० किमी प्रति तासाचा टॉप स्पीड असू शकेल. एवढेच नाही तर ही स्कूटर फक्त १८ मिनिटात ० ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. कंपनी या स्कूटरशी संबंधित विविध माहिती सोशल मीडियाद्वारे समोर आणत आहे. ही स्कूटर १० रंगांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यात रिव्हर्स ड्रायव्हिंग मोड देखील दिला जाईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर पारंपारिक डीलरशिप नेटवर्कशिवाय देशभरातील ग्राहकांना घरपोच दिली जाईल.
महिंद्रा XUV700
महिंद्रा अँड महिंद्रा आपली नवीन महिंद्रा XUV700 देशांतर्गत बाजारात लॉन्च झाली आहे. या कंपनीने आपला नवीन लोगो सादर केला आहे, जो पहिल्यांदाच या SUV मध्ये सर्वात शक्तिशाली असेल. या वाहनांत पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनचे पर्याय बाजारात आणले आहेत. या कंपनी SUV मध्ये अनेक क्लास लीडिंग फीचर्स ऑफर केली आहे. या एसयूव्हीमध्ये स्मार्ट डोअर हँडल्सचा वापर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, सुरक्षा अलार्म प्रणाली देखील देण्यात आली आहे. यामुळे चालकाला अतिवेगाने वाहन चालवण्यास अलार्मद्वारे सतर्क करून प्रतिबंधित करण्यात येते.
सिंपल एनर्जी मार्क २ इलेक्ट्रिक स्कूटर
बंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जी देखील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करेल. सदर स्कूटर ही एका चार्जमध्ये २४० किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज प्रदान करेल. एवढेच नाही तर ही स्कूटर वेगाच्या बाबतीतही खूप चांगली असेल. कारण ही स्कूटर फक्त ३.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम असून त्याचा टॉप स्पीड १०० किमी प्रति तास आहे. सदर स्कूटर सामान्य होम चार्जरसह फक्त ४० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे १ तास ५ मिनिटे लागतात. याशिवाय यात फास्ट चार्जिंग सिस्टीम देखील दिली जाऊ शकते, त्यामुळे या स्कूटरची बॅटरी फक्त २० मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर १ लाख १० हजार ते १ लाख २० हजाराच्या किंमतीत देऊ शकते.