विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाज पॅरिसला रवाना होण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली -१७ ते १९ जून दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे अंतिम पात्रता सामने २० ते २८ जून दरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी, कोमलिका बारी, अंकिता भाकत आणि मधु वेदवान आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेती पूर्णिमा महातोसह नऊ सदस्यीय महिला तिरंदाजी संघ आज पॅरिसला रवाना होत आहे.
भारताची सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडने भारतीय तिरंदाजी संघटनेबरोबर (एएआय) देशभरात तिरंदाजीचा सर्वांगीण विकास आणि जागतिक व्यासपीठावर भारतीय तिरंदाजीला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केली आहे.
एनटीपीसीचे संचालक (एचआर) दिलीप कुमार पटेल यांनी भारतीय तिरंदाजी संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. नेदरलँड्स मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारताला सांघिक रौप्यपदक मिळवून देणाऱ्या तिरंदाज अतनु दास, तरुणदीप राय आणि प्रवीण रमेश जाधव यांचा पुरूष रिकर्व्ह संघ विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पॅरिसला रवाना होत आहे.
अलिकडच्या काळात भारतीय तिरंदाज दीपिकाकुमारी, अतानू दास, अंकिता भाकत आणि कोमलिका बारी यांनी ग्वाटेमाला येथील तिरंदाजी जागतिक स्पर्धा (टप्पा-२) दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. महिलांच्या व पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह इव्हेंटमध्ये दीपिकाकुमारी व अतानू दास यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते. भारताच्या विकासाला समर्थन देण्याव्यतिरिक्त, एनटीपीसी  आपल्या समुदाय आणि समाजाच्या  समग्र विकासाला मदत करणारा आधारस्तंभ आहे.