नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) भारतीय हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल वी आर चौधरी यांनी ओझर हवाई दल केंद्राला भेट दिली. ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले. भारतीय वायुसेना अध्यक्ष पदाचा कार्यभार ३० सप्टेंबर रोजी घेतल्यानंतरचा त्यांचा हा प्रथमच नाशिक दौरा आहे. वायुसेना संगिनी कल्याण संगठन अध्यक्षा श्रीमती नीता चौधरी या सुद्धा त्यांच्याबरोबर होत्या. वायुसेना स्टेशन ओझरचे प्रमुख एयर कमोडोर राकेश कुमार खजांची आणि स्थानीय वायुसेना संगिनी कल्याण संगठन च्या अध्यक्षा श्रीमती ज्योति खजांची यांनी त्यांचे स्वागत केले.
एयर चीफ मार्शल वी आर चौधरी यांनी यावेळी वायुसेनेच्या सर्व कर्मचा-यांना भारत सरकार द्वारा निर्मित ‘अग्निवीर’हया उत्कृष्ट योजने संबंधात स्पष्ट करतांना सांगितले की, या योजने मुळे भारतीय वायुसेनेत नवचैतन्य येऊन तांत्रिक दृष्टया ती समृध्द होईल. स्टेशन मधील कर्मचा-यांची उच्च कर्तव्य दक्षता, सर्वोत्तम कार्य परिवेश तसेच उच्च मनोबलाची प्रशंसा केली.
या दौ-यामध्ये त्यांनी स्टेशन मध्ये सुरू असलेल्या सुखोई 30, एएसडी 29 वायुयान संबंधात विभिन्न परियोजनांची माहिती करून घेतली. देखभाल दुरूस्ती कार्यामध्ये स्टेशनने अग्रस्थानी राहुन स्क्वाड्न संचालन करिता सहायता मिळवून दिल्याबददल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. एयर चीफ मार्शलांनी विनिर्माण सुविधांशी संबंधित अशा1 सीआईएमडी तसेच अन्य महत्वपूर्ण विभागांचाही दौरा केला. आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत कार्य करण्यासाठी सर्वांना त्यांनी प्रोत्साहित केले तसेच आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी सर्वांना त्यांनी प्रोत्साहित करून सर्व जवानांना तसेच त्यांच्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.
श्रीमती नीता चौधरी वायुसेना संगिनी कल्याण संगठन अध्यक्षा यांनी देखील जवानांसाठी व त्यांच्या परिवारा साठी स्थानीय वायुसेना संगिनी कल्याण संगठन द्वारा निर्मित व सुरू असलेल्या विभिन्न कल्याणकारी योजनांची पाहनी केली तसेच वायु संगिनींच्या कार्यकारी समिति बरोबर बैठकीचे आयोजन करून विविध कल्याणकारी विषयांवर चर्चा केली.
Indian Air force Chief Chaudhari Nashik Visit